नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.15) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत अग्रेसन चौक, सी.ए.रोड येथील करिना डेयरी ॲण्ड डेली निडस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत कांजी हाऊस चौक, इतवारी येथील न्यू इंडियन डेयरी या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पांडे ले-आऊट, खामला येथील विजय एस आंबोरे यांच्याविरुध्द मोकळया जागेत कचरा जाळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट न.160, बजाजनगर येथील विक्रमादीत्य तिवारी यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील Baby Sure Hospital विनापरवानगीने विद्युत खांबावर बॅनर / होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग न.24, भारत नगर रोड येथील M/s Ali Saw Mill यांच्याविरुध्द दुकानातील माल रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.