स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.1) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत गोळीबार चौक, इतवारी येथील धार्मिक किराणा स्टोअर्स आणि भंडारा रोड, इतवारी येथील शिवशक्ती सेल्स या दोन्ही या दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील M/s Sunway Resedency यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच नेहरुनगर झोन अंतर्गत अनमोल नगर, वाठोडा येथील पार्थ डेव्हल्पर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलगांव में 4 एवं 5 फरवरी को ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’का आयोजन !

Thu Feb 2 , 2023
मंदिरों की समस्या सुलझाने के लिए राज्यभर से मंदिर विश्वस्त हुए एकत्र ! नागपूर :- मंदिर हिन्दू धर्म की शक्ति एवं भक्ति केंद्र हैं; परंतु आज अनेक मंदिरों का सरकारीकरण होने से आधुनिक गजनी वहां की भूमि, संपत्ति, आभूषण लूट रहे हैं; परंतु दोषियों पर कोई ठोस कार्रवाई होते हुए दिखाई नहीं देती । धार्मिक विधि-प्रथा परंपराओं में अयोग्य पद्धति […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com