नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.6) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत तांडापेठ, बिमकर कॉलोणी येथील नागमणी अगरबत्ती कारखाना यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत सुदर्शन नगर येथील लोअल वेंडर यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत 1बी, खरे टाऊन येथील Orchid Rama Keshav यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच वर्धा रोड, रामदासपेठ येथील अक्युरा पॅथालॉजी लॅब यांच्याविरुध्द पाथ लॅबचा कचरा अनाधिकृत ठिकाणी टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत बैद्यनाथ चौक येथील Golchha Ads यांच्याविरुध्द परवानगिशीवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत छोटा ताजबाग रोड येथील Tech Off Infra Pvt Ltd यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.