स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.29) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 245 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत जुनी मंगलवारी येथील सैजल ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत कळमना, कामठी रोड येथील भक्ती गॅरेज आणि तिनल चौक, इतवारी येथील निलम बेकरी यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत छत्रपती चौक, वर्धा रोड येथील श्री अर्पाटमेन्ट (बिल्डर) यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत गिटटीखदान, काटोल रोड येथील महेश साहु यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील आंभोरे नर्सिंग होम यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत सिरसपेठ येथील पवन डेअरी यांच्याविरुध्द टाकाऊ पदार्थ गडरलाईन मध्ये टाकुन गडरलाईन ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत जुनी वस्ती, झिंगाबाई टाकळी येथील जनाब इमराण अंसारी यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

Sat Oct 1 , 2022
मुंबई :-  नवरात्र उत्सवाच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात वाहून न गेलेल्या देवी मूर्तींचे छायाचित्र काढून त्याचा प्रसार होतो. यामुळे जनमानसाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. बृहन्मुंबईमध्ये होणाऱ्या देवी मूर्तीच्या विसर्जनानंतर अर्धवट विरघळलेल्या मूर्ती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com