स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.25) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 13 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील महालक्ष्मी डिस्पोझल या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आणि महालक्ष्मी भंडार या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मंगळवारी मार्केट येथील पॉझिटीव्ह टी स्टॉल या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत यशवंत स्टेडियम, धंतोली येथील टपरी चाय कप यांच्याविरुध्द कचरा टाकणे आणि अनधिकृत जागेवर पाणी व चिखल पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत ठवरे कॉलनी येथील ओमप्रकाश सुखदेव यांच्याविरुध्द लग्नाचा कार्यक्रम बंद झाल्यानंतर टाकाऊ पदार्थ/जेवण मोकळया जागेवर पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन वर्षात खासदार क्रीडा महोत्सवाची मेजवानी, उद्घाटन व समारोप समारंभात सादर होणाऱ्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष स्पर्धा १९ डिसेंबरला

Sat Nov 26 , 2022
नागपूर :- नागपूर शहरातील खेळाडूंसह असंख्य क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असणारा नागपूरच्या क्रीडा क्षेत्राचा उत्सव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पाचव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे नव्या वर्षात आयोजन होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन व समारोप समारंभामध्ये मान्यवर अतिथींपुढे सादर होणाऱ्या विविध प्रात्यक्षिकांसाठी विशेष स्पर्धा घेण्यात येत आहे. १९ डिसेंबर २०२२ रोजी महाल येथील चिटणीस पार्कवर ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना आकर्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!