नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.11) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी मार्केट येथील वैभव ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत छापरु नगर चौक येथील लोकल प्लास्टिक आणि देशपांडे ले-आऊट येथील लोकल प्लास्टिक या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रतापनगर टी-पाईंट रिंग रोड येथील Fuel Station Restraurant यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत अमृत भवन, नॉर्थ अंबाझरी रोड येथील Blue Dart यांच्याविरुध्द कार्यालयातील कचरा रस्त्यालगत मोकळया जागेवर जाळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील M/s Kavya Residency यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com