स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. 4) रोजी 22 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ,धंतोली, नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशिनगर आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई 19 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1,00,000/- रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच 89 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

          लक्ष्मीनगर झोन अंतर्गत त्रिमुर्तीनगर येथील गुप्ता फुटाना भंडारा आणि शेवाळकर गार्डन येथील बिअर्स ग्रीड यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. धरमपेठ झोन अंतर्गत अमरावती रोड येथील बॉम्बे रेस्टॉरेन्ट यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.  धंतोली झोन अंतर्गत मानेवाडा रिंग रोड येथील निशु किटस वेअर आणि मनीष नगर टी-पाईंट येथील बालाजी फुडस ॲण्ड नाश्ता यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत ओम नगर येथील नेहा पुस्तकालय यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मारवाडी चाल, संतरा मार्केट येथील वैशाली बॅग, सी.ए.रोड अग्रेसन चौक येथील दर्पण प्लास्टिक, गांधीबाग गार्डन जवळील रुप नीखार साडी सेंटर, सुत मार्केट गांधीबाग येथील मेहाडीया कलेक्शन आणि प्रेम क्लॉथ स्टोअर्स या दुकानांविरुध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसुल केला.सतरंजीपूरा झोन अंतर्गत कावडापेठ येथील अनवेशा इन्टरप्राईजेस यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच राणी दुर्गावती चौक येथील इंडीयन डेअरी यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत स्मॉल फॅक्ट्री ऐरिया येथील प्रेम शर्मा आणि जुना भंडारा रोड येथील पारस वस्त्रालय यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

आशिनगर झोन अंतर्गत वांजरा ले-आऊट येथील रुपम फुडस, पिली नदी चौक येथील न्यू इंदौर नमकीन तसेच साई चांदुराम बेकरी यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगलवारी झोन अंतर्गत पागलखाना चौक येथील Choppers The Fresh Meat Stores यांच्याविरूध्द प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

          त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा टी-पाईंट येथील बिग स्पुन आणि प्रियदर्शनी गर्लस हॉस्टेल रस्त्यालगत जेवण/खाद्यपदार्थाचा अपव्यय टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील Design Inside यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

खालील प्लास्टिक वस्तुंवर बंदी

केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि १०० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कळमेश्वर येथे जिल्हास्तरीय कृषी दिन साजरा

Tue Jul 5 , 2022
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार नागपूर  : जिल्हास्तरीय कृषी दिनाचा कार्यक्रम कळमेश्वर येथील आयरिश फार्म येथे जिल्हा परिषदच्या कृषी विभाग, पंचायत समिती कळमेश्वर तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यातआला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी विमला आर, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कमलकिशोर फुटाणे, कृषी विकास अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com