स्वच्छ भारत अभियान : विद्युत खांबावर विना परवानगी बॅनर विरोधात कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.17) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत देशमुख ले-आऊट, कांजी हाऊस चौक, इतवारी येथील M/s Shaflq Sweets या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्र नगर येथील M/s Little Step Pre School यांच्याविरुध्द रस्त्यालगत विद्युत खांबावर विना परवानगीने डिस्प्ले बॅनर / होर्डिग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मंगळवारी झोन अंतर्गत वसिम प्लाझा, कल्पना टॉकीज जवळ, मानकापूर येथील राधे इन्स्टीटयूट यांच्याविरुध्द रस्त्यालगत विद्युत खांबावर विना परवानगीने डिस्प्ले बॅनर / होर्डिग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

India has ushered into the era of cultural renaissance under Prime Minister Narendra Modi: Raksha Mantri Rajnath Singh in Somnath

Tue Apr 18 , 2023
New Delhi :- India has ushered into the era of cultural renaissance under the leadership of Prime Minister Narendra Modi. This was stated by Raksha Mantri  Rajnath Singh during his address at Saurashtra-Tamil Sangamam in Somnath, Gujarat on April 17, 2023. He stated that the Government is taking a number of steps to connect the people with the nation’s centuries-old […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com