स्वच्छ भारत अभियान : 642 किलो प्लास्टिक जप्त

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.18) 12 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 9 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 642 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत कराची गल्ली, सदर येथील कांचन साडी सेंटर, माऊंट रोड, सदर येथील क्रिष्णा शुज, मेन रोड, सदर येथील रसकुंज रेस्टॉरेन्ट आणि हिट मी कॅफे या दुकानांविरुध्द कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत भंडारा रोड, गांधीबाग येथील दर्पण सेल्स, टिमकी येथील चेतन स्विटस आणि नंगापुतळा चौक, इतवारी येथील निमजे ट्रेडर्स या दुकानांविरुध्द कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत तिन नल चौक, इतवारी येथील गुरु गोविंद सिंग आणि शहिद चौक, इतवारी येथील कल्पना प्लास्टिक या दुकानांविरुध्द कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सुभाष नगर रिंग रोड येथील Jaiswal Liqour Shop यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत प्रभाग नं.35 नरेन्द्र नगर येथील प्राईड रेसिडेन्सी (बिल्डर्स) यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत हसनबाग चौक येथील एम.जे.मोटर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा!

Wed Oct 19 , 2022
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत दिल्लीत ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी – समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वेबाबतही चर्चा – मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वे https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 – नाशिक-पुणे ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचारhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 – नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास: 487 कोटी रुपयांचा कार्यादेश जारीhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 – मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्याला नवी दिल्ली :- आशियातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प असलेल्या धारावी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com