25 पेक्षा जास्त विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण
नागपूर :- महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेचा निकाल 27 जून ला जाहीर करण्यात आला,त्यात शासकीय विज्ञान संस्था( इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) च्या 25 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी व विज्ञान संस्थेच्या यंग अल्युमनी असोसिएशनचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयात उत्तीर्ण होऊन परीक्षेत यश मिळविले.प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण होने आवश्यक असल्याने दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात.सेट परीक्षा पुणे विद्यापीठ तर्फे घेण्यात येते या वर्षी मार्च महिन्यात 26 तारखेला घेण्यात आलेल्या परीक्षेत 32 विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन एकूण 101257 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 6676 विद्यार्थी (6.59%)उतीर्ण झाले.यावर्षी महाराष्ट्र राज्यात अनेक पदासाठी भरती होत असल्याने स्पर्धा परीक्षा व प्राध्यापक भरती ची तयारी विद्यार्थी करीत आहेत.
मध्य भारतातील प्रसिद्ध असलेल्या विज्ञान संस्थेची यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली असून विज्ञान संस्थेतून शिक्षण घेतलेल्या 25 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी विविध विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली.त्यात अंकुश कुलरकर, प्रवीण कांबळे, शुभम वासाडे,शुभम पलिया, स्वप्नील बेलखुडे, निखिल इंगळे,गुलशन खरकाटे, दामोदर मस्करे, श्रीकांत कातोरे,पूर्वा खोट, हर्षींनी राठी,वैभव चणे व इतरांनी परीक्षेत यश मिळविले.
यंग अल्युमनी असोसिएशन ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर तर्फे नेट सेट परीक्षेचे मार्गदर्शन करण्याकरिता तज्ञ व्यक्तींकडून अनेक ऑनलाइन सत्र सुद्धा घेण्यात आले होते त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला अशी माहिती असोसिएशनचे अनिकेत मदनकर,परिमल गायधने, वैभव बावनकर, अक्षय पाटील,आकाश ब्राम्हणकर,शुभम मोदनकर व वैभव ढेंगे यांनी दिली.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यंग अल्युमनी असोसिएशन तर्फे अभिनंदन करण्यात आले.