प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस गोंडेगाव च्या विद्यार्थ्याचे सुयश

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – नॅशनल प्रॉअक्टिव अबॅकस स्पर्धेत वेको लि गोंडगाव वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातील जिनियस प्रॉस्क्टिवे अबॅकस क्लासेस च्या सहा विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त करून यश संपाद न केल्याने त्याना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अमरावती येथे २६ जुन रोजी पार पडलेल्या प्रोअक्टिव अबॅकस नॅशनल समर कंपिटेशन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय वेकोलि गोंडगाव वसाहत येथिल जिनियस प्रॉअक्टिव अबॅकस क्लासेस च्या सहा विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केेले. यात ६ मिनी टात १०० गणित सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेत अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, वाशीम, नागपुर तसेच मध्य प्रदेशातील ६०८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विदर्भातुनप्रोअक्टिव अबॅकस क्लासेस वेकोलि गोंडेगाव च्या  श्रावणी प्रमोद गजभिये, अंशा प्रमोद गजभिये, कु. लविषका प्रेमदास गि-हे, मृणा ली जिवलग पाटील, विधी विजय मेश्राम,  मयंक शैलेश बरोले यांनी प्राविण्य प्राप्त केल्याने कार्य क्रमाचे प्रमुख अतिथी  गिरीश करडे , तेजस्विनी सावंत, सारिका करडे डायरेक्टर प्रोॲक्टिव अबाकस मुंबई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन अभि नंदन करण्यात आले. तसेच शिक्षीका स्वाती गजभिये यांचा सुध्दा सत्कार करून गौरवविण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यपाल ने उद्धव ठाकरे को बहुमत साबित करने को कहा...

Wed Jun 29 , 2022
– कल शाम 5 बजे तक हो सकता है फ्लोर टेस्ट.. मुंबई – महाराष्ट्र की उद्धव ठाकरे सरकार की मुश्किलें लगातार बढ़ती जा रही हैं.महाराष्ट्र की राजनीतिक उथल-पुथल ने अब नया मोड़ ले लिया है. बिती रात को ही बीजेपी और कुछ निर्दलीय विधायकों ने फ्लोर टेस्ट की मांग उठाई थी. जिसके बाद राज्यपाल द्वारा महाराष्ट्र में कल विधानसभा का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com