वर्धेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांचे निलंबन – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

नागपूर :- वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केली.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री उमा खापरे, प्रविण दरेकर, सचिन अहिर आणि प्रविण दटके आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.

यावेळी लोढा म्हणाले की, सेलू जि.वर्धा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांनी चौकशी समिती गठीत केली होती. गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीने प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार मंजूर निर्वाह भत्ता व विद्यावेतनाची रक्कम प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना सदर प्रशिक्षणार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध असताना सुद्धा रोख रक्कम अदा करण्यात आल्याचे संस्थेतील नोंदीवरून दिसून आले आहे . चौकशी समितीने दिलेल्या अभिप्रायानुसार, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेलू जिल्हा वर्धा यांना कारणे दाखवा नोटीस दिनांक २८ नोव्हेंबर,२०२३ रोजी बजावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सेलू जि.वर्धा यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे सेलू जि.वर्धा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येत आहे.तसेच शासन भ्रष्टाचार करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालणार नाही, असेही  लोढा यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऑनलाइन फसवणुकीबाबत जलद प्रतिसादासाठी 'डायनॅमिक प्लॅटफॉर्म' तयार करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Dec 8 , 2023
नागपूर :- राज्यामध्ये ॲप, संकेतस्थळे, विविध समाज माध्यम ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे ॲप विदेशातून संचालित करण्यात येत आहे. अशा ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सर्वंकष असा ‘डायनॅमिक (गतिमान) प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून जलद प्रतिसाद मिळण्याची व्यवस्था होणार आहे. ही सर्व व्यवस्था एका ॲपमध्ये असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!