पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथील गणपती स्थापना बंदोबस्ताचा घेतला आढावा तसेच विसर्जनस्थळाची केली पाहणी

कन्हान :-सन २०२३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक १९/०९ / २०२३ रोजी पासुन मोठया उत्साहात सर्वत्र साजरा होत असुन त्यामध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडुन सार्वजनिक गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा होण्याकरीता बंदोबस्ताची विशेष पुर्व तयारी करण्यात आली आहे. दिनांक १९/०९/२०२३ रोजी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) यांनी पोस्टे कन्हान येथील बंदोबस्ताचे ठिकाणी भेट देवून गणपती स्थापना बंदोबस्ताचा आढावा घेतला तसेच कन्हान नदीचे काठावरील कालीघाट मंदीर विसर्जन स्थळी भेट दिली.

कालीघाट मंदीर कन्हान त्या ठिकाणी कन्हान तसेच नागपूर शहर हद्दीतील भाविक मोठया प्रमाणात गणपती विसर्जन करणार आहे. मा. पोलीस अधीक्षक यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व बंदोबस्ताबद्दल पोलीस स्टेशन कन्हान येथील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. छोटे गणपती हे कृत्रिम तलावात विसर्जित करावे व शासनाकडुन समन्वय साधून गणपती विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव तयार करून घ्यावे याबाबत सुचना दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात कोळसा माफिया यास ६ महीन्यासाठी नागपुर ग्रामीण जिल्हयातून हद्दपार

Thu Sep 21 , 2023
कन्हान :- पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार ” भुजंग जनार्धन महल्ले याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहशतीचे प्रभाव संपविण्याचे उद्देशाने त्याचे विरुद्ध कन्हान पोलीसांकडुन कलम ५६(१) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये इस्तगासा तयार करून मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्याकडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com