संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिटी हॉस्पिटल समोरील कुंभारे ले आऊट येरखेडा परिसर रहिवासी एका इसमाने मागील दोन महिण्यापासून विलंबाने होणाऱ्या पगाराच्या मानसिक तणावातून बाथरूम मध्ये जाऊन एरोपेक्स नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अतुल अशोक रणके वय 40 वर्षे रा कुंभारे ले आऊट ,येरखेडा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक कार्यरत असलेल्या विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून वेळेवर पगार होत नसल्याने मानसिक तणावातून घरातील बाथरूम मध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.