माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा

– शासन स्तरावर समस्या मार्गी लावण्यात ना. सुधीर मुनगंटीवार सक्षम

– प्रदेशाध्यक्ष तुळशीराम हनुमान जांभुळकर यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर :- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. पत्रकारांच्या अडचणी आणि समस्यांची जाणीव ना. सुधीर मुनगंटीवार यांना आहे. त्यांच्या समस्या शासन स्तरावर मार्गी लावण्यात ना. मुनगंटीवार हे सक्षम आहे. त्यानुषंगाने आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्यावतीने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा देतो, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम हनुमान जांभुळकर यांनी चंद्रपूर येथील आयोजित कार्यक्रमात दिली.

चंद्रपूर येथे आयोजित राज्य व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या संघटनेचा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना पाठींबा देण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ते म्हणाले की, हि निवडणूक अतिशय महत्वाची असून आपल्या हक्काचा माणूस संसदेत पाठविणे काळाची गरज आहे. मागील सडेचार वर्षात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कुठलेही विकास कामे झालेली दिसत नाही. आपल्या संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आमच्या समस्यांची जाणीव ना. मुनगंटीवार यांना आहे. तेच आपल्या समस्यांना न्याय देऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी सर्वांनी दिवसरात्र एकजुटीने शर्थीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सुधीर मुनगंटीवार निवडून आले तर संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास तर होईलच पण आपल्या संघटनेच्या मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत त्याची पूर्तता होण्यासाठी सुधीर भाऊंना संसदेत पाठवू, त्या समस्या मार्गी लावण्यात ना. मुनगंटीवार हे कसोशीने प्रयत्न करतील असा विश्वास आहे, असा निर्धार माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेने केला आहे.

यावेळी राज्य व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम हनुमान जांभुळकर,राज्य महिला अध्यक्ष शिल्पा प्रफुल बनपुरकर, अरुण माधोवार, नागेंद्र चटपल्लीवार, करन कोलगुरी, माणिक हिकरे, राजेंद्र तराळे, तारका खोब्रागडे, किशन माटे, राजू शंभरकर, अनंतराव रामटेके, सौ. रजनी झाडे, सुनील रामटेके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एका चारचाकी कार ची दुस-या कार ला जोरदार धडक

Thu Apr 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – भिष्ण अपघातात महिला वकील, चालक व आमदाराचे स्वीय सचिव जख्मी.  कन्हान :- एका चारचाकी कार ची दुस-या कार ला जोरदार धडकेत झालेल्या भिष्ण अपघातात महिला वकील गंभीर जख्मी असुन चालक व आमदाराचे स्वीय सचिव जख्मी असुन खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.  बुधवार (दि.१०) एप्रिल ला पंतप्रधान नरेन्द्र मोदी या़ची सभा कन्हान शहरात असल्याने आमदार आशिष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com