नागपूर :- जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ, नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष शेखर आदमने तसेच जैन कलार सेवा समिती, “प्रयास”, नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शशिकांत समर्थ यांच्या नेतृत्वाखाली आणि नागपूर जिल्हा समिती अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या व समस्त कार्यकारिणीच्या परिश्रम आणि सहकार्याने जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ (केंद्रीय व जिल्हा समिती, नागपूर) व जैन कलार सेवा समिती, “प्रयास” च्या वतीने अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडप्यांचे विवाह अनेक मान्यवर व समाजाच्या साक्षीने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा सदस्य सुनील केदार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मध्य नागपूर आमदार विकास कुंभारे, दक्षिण नागपूर आमदार मोहन मते, गिरीश व्यास, आभा पांडे, शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, अतुल लोंढे, अतुल कोटेचा, कलचुरी एकता सर्ववर्गी संघ महाराष्ट्र प्रदेश चे सर्वेसर्वा दीपक जायस्वाल, जैन कलार समाज न्यास माजी अध्यक्ष अनिल अहिरकर आणि अनेक मान्यवरांनी नवदाम्पत्यांना शुभआशीर्वाद प्रदान करीत शुभेच्छा देत आयोजकांचे अभिनंदन केले.
१६ ही नवदाम्पत्यांना जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ तर्फे ११,०००/- चा धनादेश, जैन कलार सेवा समिती, “प्रयास” तर्फे गॅस-शेगडी आणि समाजमान्यवर तसेच विविध समाज संघटनांच्या वतीने प्रेम व आशिर्वादांसह अमूल्य भेटवस्तू वितरित करण्यात आल्यात.
आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. कार्तिक शेंडे, रविकांत हरडे, विलास हरडे, संजय खानोरकर, किरण गोसेवाडे, कृष्णा खानोरकर, स्वप्निल समर्थ, मोरेश्वर मानापुरे, विनोद खानोरकर, प्रदीप हरडे, संजय शिरपूरकर, रमेश लांजेवार, मिलिंद मानापुरे, गणेश दुरुगकर, दिलीप पलांदूरकर, राजेंद्र वारजूरकर, सुबोध पेशने, संदीप खंगार, शिवम पलांदुरकर, चुनोती मोटघरे, रोहन खानोरकर, राहुल शेंडे, विनोद खेडीकर, अतुल खोब्रागडे, राहुल हरडे, चित्रा डांगे, अजय लाड, भूषण समर्थ, लूखराम खोब्रागडे, रवींद्र भांडारकर, नरेंद्र पलांदूरकर, रविंद्र सुरकर, सोनाली नाकतोडे समस्त केंद्रीय समिती, जिल्हा समिती, महिला समिती व प्रयास पदाधिकाऱ्यांनी मोलाचे श्रम घेतलीत.
आयोजनाचे अतिथी म्हणून सर्वश्री. यादवराव शिरपूरकर, अशोक खानोरकर, आनंदराव ठवरे, कमलेश समर्थ, अर्चना विनोद हरडे व अनेक मान्यवर समाज मंडळी प्रत्यक्ष उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत समर्थ यांनी सादर केले, नागपूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी मनोगत व्यक्त केले तर संचालन स्वरूपात कार्यक्रमाची धुरा स्वप्निल मदन समर्थ यांनी यशस्वीपणे सांभाळली व आभार अध्यक्षीय उद्बोधनासह शेखर आदमने यांनी मानलेत.
आयोजनाला जिल्हा व केंद्रीय समिती-जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ, जैन कलार सेवा समिती, “प्रयास”, जैन कलार युवा समितीचे विशेष सहकार्य लाभले.
आयोजनाला प्रामुख्याने सुरेखा अनिल अहिरकर, डॉ. मंगला दत्तात्रय हरडे, विद्या शशिकांत समर्थ, स्वाती संजय शिरपूरकर, रश्मी श्रीकांत शिवणकर, चित्रा डांगे, वीणा खानोरकर, संगीता शैलेंद्र दहिकर, वनिता मोटघरे, डॉ. छाया दुरुगकर, माधुरी घोसेकर, श्वेता अतकर, संगिता अतकर, विना विनोद खानोरकर, शुभांगी किरण गोसेवाडे, पद्मा कार्तिक शेंडे, विना प्रदीप हरडे, शालिनी रमेश लांजेवार, ममता स्वप्निल समर्थ, मनीषा मोरेश्वर मानापुरे आणि प्रयास महिला समिती, जैन कलार महिला समिती, इतर महिला संघटनेचे विशेष सहयोग सक्रिय उपस्थिती सहीत लाभलेत.