नागपूर :- उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग नागपुर ग्रामीण यांचे पथकाकडुन अवैद्य जुगार खेळणारे लोकांवर कार्यवाही करण्यात आली असून सदर कार्यवाही मध्ये एकूण १४,४८,५६०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
गोपनिय बातमीदारद्वारे खात्रीलायक खबर मिळालेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग नागपुर ग्रामीण यांनी पो.स्टे. बुट्टीबोरी हद्दीतील मौजा खरसोली शिवारात ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या लोकांवर लपत छपत घेराव करून छापा कार्यवाही केली. सदर कारवाई मध्ये १) सोहल नवाब अन्सारी वय ३५ वर्ष रा. हजारी रोड लाल स्कुल जवळ मोमीनपुरा नागपुर ता. जि. नागपुर २) रूपेश छत्रपती गिरंपुजे वय २४ वर्ष, रा. एस टिडे पो मागेराम नगर वर्धा ३) सेवक रमेश चौधरी वय २६ वर्ष, रा. जुनी मंगळवारी भुजाडे मोहल्ला हत्ती नाला नागपुर ता. जि. नागपुर ४) रोशन प्रभाकर पानबुडे वय २८ वर्ष रा. गाडगेबाबा नगर, रमना मारोती नागपुर ता. जि. नागपुर ५) यश आनंद पडोळे वय २४ वर्ष रा. प्लाट नंबर २८ दुसरा स्टाप गोपाल नगर नागपुर ६) गजानन विश्वनाथ पाटील वय ६३ वर्ष रा. प्लाट क्र. २८ बौध्द विहार जवळ नरेन्द्र नगर नागपुर ७) संतोष विनायक वेलतुलकर वय ४८ वर्ष रा. जुनी मंगळवारी पिन्दु सावजी धावा जवळ नागपुर ८) सलाउद्दीन वल्द गॅसुददीन वय ४८ वर्ष रा. मोमीनपुरा दर्गा नागपुर ता. जि. नागपुर ९) रूपेश निर्मल सोलिया वय ३४ वर्ष रा. टिमकी बाजार नागपुर १०) आकाश दिलीप इंगळे, वय २८ वर्ष, रा. गोपाल नगर पाहिला बसस्टाप नागपुर ११) प्रणय सुजीत गायकवाड वय २५ वर्ष रा. सावित्रीबाई नगर मानेवाडा नगर नागपुर १२) रवी वामन मोहीते वय ३४ वर्ष रा. खरबी चौक शेष नगर नागपुर ता. जि. नागपुर १३) अर्जुन शंभु राणा वय २५ वर्ष रा. मानव शक्ती ले आउट बाहादुरा नागपुर १४) योगल यशवंतराव पटले वय २६ वर्ष रा. मानव शक्ती ले आउट बाहादुरा नागपुर १५) रोहीत सुनील ठाकरे वय ३२ वर्ष रा. शिवन गाव पुनवर्सन चिचभवण नागपुर १६) सुनिल दादु विनेस वय २५ वर्ष रा. रेणुका माता नगर प्लाट नंबर ४८ नागपुर १७) अनिल भैय्याजी राउत वय ४५ वर्ष, रा. न्युविडी पेठ धांडे किराणा जवळ नागपुर यांचे अंगझडती मध्ये नगदी २,३४,५१०/- रू ५२ ताश पत्ते, १४ अँड्राईड मोबाईल फोन किंमती १,००,०००/- रू तसेच जुगार खेळणेकरीता पटणास्थळावरील वाहण ०१ चारचाकी कार व १२ दुबाकी वाहण किं. ११,१०,०००/- रू चा असुन, असा एकुण किमंती १४,४८,५६०/-रू. चा मुददेमाल मिळून आला. तसेच सदर जुगार हा सोनु उर्फ ऐल्या मेश्राम नावाचा इसम भरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने एकुण १८ आरोपीतांविरूध्द कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम १०९ भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर जुगाराची माहिती पुजा गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग नागपुर ग्रामिण यांना मिळताच त्यांनी मिळालेल्या माहीतीची गोपनियता पाळून उपविभाग नागपुर अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन एम आय डि सी बोरी, बुट्टीबोरी येथील अधिकारी व कर्मचारी याचे विशेष पथक तयार करून सापळा रचुन छापा कारवाई करण्यात आली.
सदरवी कार्यवाही ही हर्ष पोहार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पूजा बा. गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग, नागपूर ग्रामीण यांचे नेतृत्वात पोउपनी जगदिश पालीवाल, पोहवा प्रविण देव्हारे, पोहवा अरून कावळे, पोहवा जयसिंगपुरे, पोना रोशन बावणे, पोशि गौरव मोकडे, पोशि पांडुरंग मुडे, पोशि गजानन पंचबुधे, पोशि विशाल यांनी केली.