बेला :- येथील लोकजीवन विद्यालय व महाविद्यालयात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना स्वयंशासनांतर्गत शिक्षक होण्याची संधी मिळाल्याने ते आनंदीत झाले. शाळेचे प्राचार्य सुनील मुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक राजेश शिवरकर, गिरीधर मेश्राम व संपूर्ण शिक्षक उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.तद्वतच लोक जीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक देशभक्त यादवराव देशमुख, शाळेला वटवृक्ष करणारे माजी प्राचार्य चंपतराव देशमुख व आद्य शिक्षिका प्रतिभा देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्ष वर्षा बाभुळकर, उपाध्यक्ष राजीव देशमुख व ॲड. सुबोध देशमुख यांनी शाळेतील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
वर्ग 5ते 12मधील अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना विद्याधनाचे धडे दिले. या कामी राजेश शिवरकर, आशिष देशमुख,लक्ष्मण खोडके, आरती मुलेवार, उकेश सातपुते, गणेश लांबट, अरविंद भडे, प्रशांत भोंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रगती लोहकरे यांनी केले.