तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पोरवालच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज मैदानात आयोजित कबड्डी स्पर्धेत पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विजय संपादन करत पोरवाल महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली.अंडर १९ मध्ये पोरवालच्या विद्यार्थिनींचा सामना प्रागतिक विद्यालय कोराडी सोबत झाला. पहिल्या डावामध्ये प्रागतिक विद्यालयाने नऊ गुण मिळविले तर पोरवालच्या विद्यार्थिनींनी १८ गुण होते. मात्र विपिक्षा डोंगरे ने खेळ रंगात आणत दुसऱ्या गावामध्ये परत १८ गुणांनी लीड करून विजय मिळवून दिला. अशा प्रकारे पोरवाल संघ ३२ गुणांनी विजय ठरला. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी स्पर्धेत संचिता शिंदे, अश्विनी बावणे, प्रियंका कोठेकर, विपीक्षा डोंगरे सेजल धोंगडे धनश्री डगलवार ,गुंजन मेश्राम, गुंजन वानखेडे, नंदिनी सहानी संजीवनी बेले, सना शेख या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व पोरवाल संघाला विजय मिळवून दिला. विजय संघाचे नेतृत्व क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका मल्लिका नागपुरे यांनी केले. विजेता संघाचे अभिनंदन प्राचार्य डॉ. विनय चव्हाण व प्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल पर्यवेक्षक विश्वनाथ वंजारी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

HR NEXUS 2024 : PIONEERING THE FUTURE OF HR IN CENTRAL INDIA NADP HOSTS CENTRAL INDIA’S LARGEST HR CONCLAVE 2024

Tue Sep 24 , 2024
Nagpur :-National Academy of Defence Production (NADP) successfully hosted HR Nexus 2024, the largest HR event in Central India’s history. Organized under the aegis of the National HRD Network (NHRD) with IIM Indore as the knowledge partner and Yantra India Limited, Coal Indian Limited as the corporate sponsors, and IMT Nagpur, CIBMRD, RBU as Academic partners, the event brought together […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com