गोंदिया :- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात जागतिक हाथ धुणे दिवसाच्या निमित्ताने नीट हाथ कसे धुतल्या जातात, याचे मार्गदर्शन करण्यात आले. विध्यार्थ्यानी प्रात्यक्षिक करून नीट हाथ धुण्याचे कौशल्य आत्मसात केले.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात जागतिक हाथ धुणे दिवसाच्या निमित्ताने नीट हाथ कसे धुतल्या जातात आणि त्याचे महत्व व परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. भावेश जसानी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रवीण कुमार, ग्रंथपाल डॉ. सुनील जाधव, प्रा. घनशाम गेडेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हाथ धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. विध्यार्थ्यानी प्रात्यक्षिक करून नीट हाथ धुण्याचे कौशल्य आत्मसात केले. प्रात्यक्षिक करण्यासोबतच मनातील प्रश्न विध्यार्थ्यानी उपस्थित केले. शंकाचे निरसन उपस्थित प्राध्यापकांनी केले. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. शारदा महाजन म्हणाल्या, कोविड काळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती काय असते, याचे महत्व प्रत्येकाला कळले. आपला सर्वांचा सर्वात महत्वाचा साथीदार म्हणजे आपले शरीर. आपल्या शरीराची नीट निगा राखणे, काळजी घेणे, आजार होऊ नये यासाठी दक्ष राहणे, ही आपली जबाबदारी आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी आपण काय आणि कसे खातो हे महत्वाचे आहे. हाथाने प्रत्येक वस्तू तोंडाद्वारे पोटात ढकलतो. त्यामुळे हात निर्जंतूक असणे गरजेचे. त्यामुळे कोणतेही काम केल्यानंतर आपले हाथ नीट स्वच्छ करणे, यावर आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आरोग्याची गुरुकिल्ली सांभाळण्यासाठी हाथ नीट धुण्याचे कौशल्य शिकणे आवश्यक आहे, असे डॉ. महाजन यांनी सांगितले. हाथ धुण्याच्या प्रात्यक्षिकात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मुन्ना राणा यांचेसह विध्यार्थ्यानी सहकार्य केले.