रवी आकरे व चंद्राहास चौधरी यांच्या संकल्पनेतून वर्ग मित्राची 34 वर्षानी भरणार शाळा.
पारशिवनी :- तब्बल 34 वर्षांपूर्वी पारशिवनी येथील विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत असलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प केला आणि सुरू झाली शोधमोहीम. ते शक्य नव्हते आणि कठीणही होते. पण निश्चय मोठा होता. त्यामुळे ते जुळत गेले आणि पुन्हा ते विखुरलेले बालमित्र एकत्र आले. शाळेत शिकत असताना 34 वर्षांपूर्वी जेथे गुरुजींनी सहल आणली होती त्याच निसर्गरम्य नदी किनारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील निसर्गाच्या सानिध्यात एक दिवसाची शाळा भरणार. येथे शाळेची ना ईमारत राहणार तर निसर्गाच्या सान्निध्यात भरणाऱ्या वर्ग मित्राच्या एक दिवसीय शाळेत गुरूंजनाचा गुरूदक्षिणा देऊन गौरविण्यात येणार आहे.
शालेय जिवनात शिस्तीचे पालन करीत मिरवणारे शालेय विद्यार्थी दहावीच्या परीक्षेनंतर विखुरले ते पुन्हा कधी दिसले नाही. काहींचा तर नाव पत्ता ही नसेल. कोण, कुठे, काय करतो ? कुणालाही माहिती नाही, पण या बालमित्रांना एकत्र करता येईल का ? असा विचार वर्ग मित्र रवी आकरे. चंद्रहास चौधरी. एकनाथ दुबे. यांनी मित्रांजवळ बोलून दाखवला आणि सुरू झाली शोधमोहीम. 1992 मध्ये सर्वोदय विद्यालय व हरिहर विद्यालय पारशिवनी येथे वर्ग 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू केली व अखेरीस यश मिळाले पारशिवनी तालुक्यातील विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर आपापल्या सोयीनुसार सर्व जण बाहेर गेले. कुणी सीआरपीमध्ये देशाच्या संरक्षणासाठी, कुणी राज्य पोलीस विभागात, कुणी उत्तम शेतकरी, कुणी व्यावसायिक, कुणी शिक्षक, अश्या तर कोणी डॉक्टर, इंजिनियर, जिल्हाधिकारी अशा पदावर कार्यरत आहेत त्याना हाॅटशापच्या गृपमध्ये जोडले व पाहता पाहता सर्व वर्ग मित्राना जोडले व ठरले सर्वानी एकत्र येऊन आपल्याला शिकणार्या शिक्षकांना एक दिवसीय शाळेत सहभागी करून त्यांना गुरू दक्षिणा देऊन गौरविण्यात येणार.
शिक्षकांचीही उपस्थिती, शिक्षकांचा सत्कार 1982 ला दहाव्या वर्गात असणारे विद्यार्थी आज एकत्र येणार . कित्येक वर्षानी एकत्र आल्यानंतर प्रारंभी तर एकमेकांना ओळखतसुद्धा नव्हते. या सर्वाना एकत्र करण्यासाठी मागील एक वर्ष प्रयत्न केले. सोशल मीडियामुळे हे शक्य झाले. पुणे, धुळे, नागपूर, अकोला, यवतमाळ आदी लांब अंतरावरुन माजी विद्यार्थी एकत्र येणार.
वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांना एकत्र करता येईल का ? असा प्रश्न दुबे, चौधरी, आकरे येथील यांच्या मनात आला. त्यांनी कमल पालीवाल. गोपाल कडू या मित्रांना सांगितले आणि सर्वांना एकत्र करण्याची शोधमोहीम सुरू झाली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले हे सर्व जण एकत्र आले. तब्बल 33 वर्षांनी विद्यार्थी भेटले. शिक्षकांमध्ये धर्मपुरीवार, बोकडे, राजुरकर, श्रीखंडे आदी शिक्षकांशी संपर्क केला.
व वर्ग मित्राच्या एक दिवसीय शाळेत सहभागी होऊन आम्हाला गुरूदक्षिणा देण्याचे सौभाग्य मिळावे अशी आशा केली.
@ फाईल फोटो