विद्यार्थ्यांनो शिक्षणातूनच गुलामी दूर होते – माजी अपर जिल्हाधिकारी

नागपूर :- आदिम संशोधन-अध्ययन मंडळ व अस्तित्व क्रियेशन यांच्या माध्यमाने मागासवर्गीय व आदिवासी समाजातील वर्ग ७,८ व ९ वी च्या गरीब विद्यार्थीचे व्यक्तीमहत्व बाल विकास शिबीर १० दिवस घेण्यात आले. यानिमित्ताने विणकर कॅालोनी तांडापेठ येथे समारोपाचा कार्यक्रमात भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतीबा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रास प्रमुख पाहुण्यानी माल्यार्पण करून अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हलबा समाज पारिवारिक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वैद्य तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते होते, कार्यक्रमाच्या मंचावर आदिम युथ फाऊंडेशनचे सचिव ओमप्रकाश पाठराबे, दिगंबर कूहीकर,एडवोकेट प्रीति  टोपरे, किशोर पाटणकर, नारायण भनारकर, वासुदेव वाकोडीकर,बलवंत मेश्राम , हरेश निमजे,सरोज निमजे, प्रशांत सिलेकर, जे.बी. साल्वे, भास्कर पराते, शालिनी निमजे ,विजय भनारकर, विष्णु भनारकर उपस्थित होते.

या बाल विकास शिबीरातील गरीब विद्यार्थांना संबोधीत करतांना माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते म्हणाले की घरात आर्थिक अडचण असली तरी, घरात शिक्षणाचा अभाव असला तरी आणि कुटूंबाची गरीब परिस्थिती असली तरी विद्यार्थांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये शिक्षणाने बुध्दीमत्ता वाढून स्वाभिमान जागृत होत असल्याने गुलामाचे जिवन जगण्यापासून मुक्ती मिळते पर्यायाने शिक्षणातूनच गुलामी दूर होते, त्यामुळे विद्यार्थांनी शिक्षणाचे महत्व ओळखून घेत शिक्षण घ्यावे.

या शिबिरात लालगंज, नाईकतलाव,तांडापेठ, विणकर कॅालोनी या भागीतील गरीब कुटूबातील मुले उन्हाळात दिशाहीन होऊन फिरत असतात, त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम १० दिवसात राबविण्यात आले. या शिबीराचा समारोप कार्यक्रमात शिबीरातील विद्यार्थांनी स्पर्धेत जिंकले त्यांना प्रमुख पाहण्यानी बक्षिसाचे वाटप केले. गरीब कुटूबांतील या विद्यार्थांमध्ये पुढे शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्याच्या हेतूने स्कुल बॅग, कंपास, वाटरबॅग इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप सर्व विद्यार्थांना करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रकाश दुलेवाले यांनी तर शिबिराला यशस्वी करण्याचे कार्य कोमल पिंपळीकर व शुभम उमरेड़कर यांनी केले. या समारोप प्रसंगी योगेश धकाते, मयूर उमरेडकर, चंदू पिंपळीकर, निखिल वाकोडीकर, सुमीत पिंपळीकर, आदित्य पौनिकर, अंशुल पिंपळीकर, चंदन उमरेडकर, यश बरबटे, दुर्गेश डेकाटे, गौरव पिंपळीकर, प्रज्वल चांदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि अधिका-यावर कडक कारवाई करा अन्यथा जन आंदोलनास सामोरे या ! - प्रकाश जाधव

Sun May 26 , 2024
– कोळसा खान ब्लॉस्टिंग, दुषित पाणी व डम्पिंग मुळे उंच डोंगराचा नागरिकांचे जिवन धोक्यात.   कन्हान :- वेकोलि कामठी उपक्षेत्रांतर्गत शासनाच्या सर्व विभागातील सुरक्षेच्या अटी व शर्ती पायदळी तुडवित तानाशाही वागणुकीने कोळसा खानची ब्लॉस्टिंग हाद-याने, दुषित पाणी, धुळ प्रदुषनाने व ओबी डम्पिंग च्या उंच डोंगरामुळे नागरिक त्रस्त असुन जिवितास अनेक धोके निर्माण झाल्याने प्रचंड चिड व असंतोष नागरिकांत खदखदत असल्याने कोळसाखानची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com