संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- श्री बळिराम दखने हायस्कुल कन्हान येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या निमित्त ” विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन ” कार्यक्रमात तृणधान्य पिकाबाबत शास्त्रीय माहिती आणि खेळीमेळीच्या वातावरणात धान्य पिकाबाबत माहिती व जागरूकता निर्माण करण्यात आली.
शुक्रवार (दि.४) ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ या निमित्त” विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम नियोजन” निमित्य कार्यक्रम श्री बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांच्या अध्यक्षेत तर मार्गदर्शक कृषी पर्यवेक्षक जे बी भालेराव, कृषी सहाय्यक कन्हान विवेकानंद शिंदे, ज्ञानप्रकाश यादव, सचिन अल्लेडवार यांच्या प्रमु़ख उपस्थित घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक विवेकानंद शिंदे यानी केले. यावेळी भारत जगातील पोष्टिक तृण धान्य पिकवणारा प्रमुख देश आहे. केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, नाचनी, वरील, शेळी, कुंदे, कृती, सावंत राजगिरा आदी पिकाचे वर्गीकरण हे पौष्टिक तृणधान्य म्हणुन केले आहे. सध्या आपल्या देशात, राज्यात पौष्टिक धान्याचे क्षेत्र कमी होत असल्याचे पाहायला मिळते, पौष्टिक गुणधर्माचे महत्त्व विचारात घेत संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष म्हणुन घोषित केले आहे. तृणधान्य पिका बाबत शास्त्रीय माहिती देत मार्गदर्शन कृषी प्रर्यवेक्षक भालेराव हयांनी विद्यार्थ्यांना केले. कृषी मित्र प्रफुल नागपुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन खेळी मेळीच्या वातावरणात धान्य पिकाबाबत माहिती व जागरूकता निर्माण केली. याप्रसंगी मु़ख्याध्यापिका ठमके यांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना तृणधान्य मिनी किट वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जौंजाळ यांनी तर आभार भाग्यश्री नखाते यांनी व्यकत केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.