कामठी तहसील महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून कोणतेही कारवाई होत नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कामठी तहसील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने काल 10 जुलै ला काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले तर आज 11 जुलै ला तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने करण्यात आले तर उद्या 12 जुलै ला शुक्रवारी लेखणीबंद आंदोलन केले जाणार तर 15 जुलै पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका कामठी च्या वतीने तहसीलदार गणेश जगदाळे यांना आधीच निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माधुरी उईके, सुनीता जाधव,ज्योती दोरसेटवार,मंगला दिवटेलवार,संगीता तेलपांडे, डडमल,भुपेंद्र निमकर,अमोल पौड, प्रेम खुपसे, सुखदेव बोडी, नितीन टेंभुरने, ममता कांबळे,सुनीता डेकाटे, वसुंधरा मानवटकर,रेखा उबरकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 95 प्रकरणांची नोंद

Thu Jul 11 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई    नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. 10) रोजी उपद्रव शोध पथकाने 95 प्रकरणांची नोंद करून 56 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com