मनपा प्रवर्तन विभागाद्वारे सीताबर्डी मार्केट व महालच्या अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई

– अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांची प्रत्येक्ष पाहणी

नागपूर :- नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात मनपाद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात प्रवर्तन विभागामार्फत सोमवारी (ता:5) सीताबर्डी मार्केट व महालच्या अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त प्रकाश वराडे, हरीश राऊत, प्रवर्तन अधीक्षक संजय कांबळे, कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे, नरेंद्र तोटेवार, राहुल गायकी यांच्यासह पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कारवाई दरम्यान सीताबर्डी मार्केट येथील परवाना धारकांना हॉकर्स यांना नियमानुसार दुकाने लावण्याचे सूचित करण्यात आले. याशिवाय परवाना नसलेल्या हॉकर्सच्या वस्तूंची जप्ती करण्यात आली.

म.न.पा प्रवर्तन विभाग मार्फत धरमपेठ झोन क्र ०२ अंतर्गत झोन कार्यालय ते व्हेरायटी चौक ते लोहा पूल चौक पर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये धरमपेठ झोनचे अतिक्रमण पथक चे संयुक्तरीत्या कारवाई करण्यात आली कारवाई मध्ये गेर लायसन्स धारक हॉकर्स वाल्यांचे लायसन्स तपासण्याची कारवाई करण्यात आली.

याशिवाय गांधीबाग झोन क्र ०६ संयुक्तरित्या दोन्ही अतिक्रमण पथक अंतर्गत झोन कार्यालय ते महाल चौक ते बडकस चौक ते गंगापूर चौक ते शहीद चौक परत नंगा पुतला चौक ते गांधीबाग उद्यान परिसर ते चितार ओली चौक ते बडकस चौक ते लकडा पूल चौक ते कल्याणेश्वर मंदिर परिसर ते परत बडकस चौक अग्रेसर चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 03 ट्रक साहित्य जप्त करण्यात.

तसेच हनुमान नगर झोन क्र ०३ आणि धंतोली झोन क्र ०४ अंतर्गत संयुक्तरित्या दोन्ही अतिक्रमण पथक झोन कार्यालय ते मेडिकल चौक ते उंट खाना रोड ते बैद्यनाथ चौक ते परत मेडिकल चौक पर्यंत अतिक्रमण ची कारवाई करण्यात आली ज्या मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले असे अंदाजे 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वैद्यकीय प्रतिपुर्ती विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणासाठी  30 दिवसांत विमा हप्ता भरण्याचे कोषागाराचे आवाहन

Tue Aug 6 , 2024
Ø नव्या सदस्यांना 90 दिवसांचा प्रतिक्षा कालावधी नागपूर :– वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे ३० दिवसांत नुतनीकरण करणे आवश्यक असून या योजनेत नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांना ९० दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन, प्रभारी वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी केले आहे. शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित अधिकारी-कर्मचारी तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारक व कुटुंबांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com