नागपूर :- बहुजनांनो जर भारताचे संविधान वाचवायचे असेल तर बहुजन समाजाचे संघटन असलेल्या बसपाला मजबूत करावे, कारण आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्या काँग्रेसने संविधानाची ऐशी तैशी केली तर भाजप सरकार संविधानालाच निकालात काढायला निघाली आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर यांनी व्यक्त केले.
काल वाठोडा येथील संत गोरा कुंभार सभागृहात पूर्व नागपूर विधानसभा संघटन समीक्षा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजभर बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी समाजावरील अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर बहणजी यांच्या नेतृत्वातील बसपाला शासक बनवावे असे आवाहन केले. समाजाची खरी ताकद ही संघटनेत असते आणि संघटना ही स्थानिक बूथ पासून तर सेक्टर व विधानसभा स्तरावरील कार्यकर्त्यांच्या भरोशावर असते. हा कार्यकर्ताच मुळात पक्षाचा कणा असतो असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशचे स्थानिक प्रभारी एड सुनील डोंगरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपा चे महासचिव नागोराव जयकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, माजी प्रदेश महासचिव जितेंद्र घोडेस्वार, उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, विद्यार्थी नेते मुकेश मेश्राम, विधानसभा प्रभारी एड ध्रुवकुमार मेश्राम, महासचिव सचिन मानवटकर, अनिल घुसे, सागर लोखंडे, रोशनी दास आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष धर्मपाल गोंगले, सूत्रसंचालन संजय इखार यांनी तर समारोप महिला संयोजिका छबीता पाटील यांनी केला.
संघटन समीक्षा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते