संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती व पावनगाव सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी यांच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कार समारंभ व स्नेहमीलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी 34 सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष ,संचालक यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कामठी तालुक्यातील सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. माजी मंत्री सुनील केदार यांच्या माध्यमातून शेतकरी मजुरांना मदत करण्याचे काम केल्या जाईल असे मत सुरेशभाऊ भोयर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बाळू शहाणे, जी प सदस्य दिनेश ढोले, व सभापती अनिकेत शहाणे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केल्या जाईल असे मत सभापती अनिकेत शहाणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन उपसभापती व अध्यक्ष पवनगाव सेवा संस्था कुणाल इटकेलवार यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रमात दिनेश ढोले, काशिनाथ प्रधान,युवराज शहाणे,कमलाकर मोहोड,प्रभाकर हुड,सुधीर शहाणे,कृष्णाजी करडभाजने,नंदू दडमल,गणपत वानखेडे,विजय खोडके,विलास भोयर, ऋषी भेंडे,प्रकाश गजभिये, किशोर धांडे,रमेश कडू,प्रवीण कुथे,अनंता वाघ,कमलाकर बांगरे,कमला बावनकुळे,पुंडलिक काकडे, महादेव फुके, रमेश विघे, श्यामराव इंगोले,राजेंद्र वानखेडे, हेमराज शिंगणे,नीलकंठ भगत, इतर मान्यवर उपस्थित होते.