गडकरींच्या जनसंपर्कादरम्यान तुफान समस्यांचा पाऊस..

– नागरिकांशी साधला थेट संवाद

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागरिकांसाठी आज जनसंपर्क कार्यक्रम झाला. खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जनसंपर्क कार्यक्रमाला मिळाला. दीर्घ कालावधीपर्यंत ना. गडकरी यांनी नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या.

नागरिकांच्या समस्यांची सर्व निवेदने आता संबंधित विभागाकडे पाठवून त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. आज सकाळी 8 वाजेपासूनच नागरिकांनी ना. गडकरींच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात समस्यांची निवेदने घेऊन गर्दी केली होती.

कोरोनाच्या काळानंतर प्रथमच झालेल्या या जनसंपर्क कार्यक्रमाला झोपडपट्टीतील गरीब माणसापासून उद्योगपतींपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी व महिलांनी तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

सकाळी 10.30 वाजता जनसंपर्क कार्यालयात येताच ना. गडकरींनी आलेल्या जनतेला अभिवादन करीत त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात करून त्यांची निवेदने स्वीकारली. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना समस्येबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे सुरु केले. अगदी वयोवृध्द आजोबा-आजींपासून ते महाविद्यालयीन तरुण-तरुणींपर्यंत सर्वांशी ना. गडकरींनी संवाद साधला. यात उद्योगपती व नवीन प्रकल्पासाठी दिशा मिळावी या उद्देशाने आलेल्या तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांची प्रचंड गर्दी असतानाही प्रत्येकाची भेट त्यांनी घेतली. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या काही शिष्टमंडळांनीही नितीन गडकरींची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांना सांगितल्या. या गर्दीत दिव्यांग व दोन अंध विद्यार्थिनीं नही नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्या अवगत केल्या.

आजच्या या जनसंपर्क कार्यक्रमात महामार्ग, मनपा, नासुप्रच्या शहरातील रस्त्यांच्या समस्या, गडर लाईन, पाण्याच्या पाईपलाईन, स्वच्छता, नोकरी, अनुकंपा तत्त्वावरील नोकर्‍या, आरोग्य, पंतप्रधान आवास योजना, शाळा प्रवेश, संजय गांधी निराधार योजना, जिल्हाधिकारी कार्यालयासंबंधित विषयाच्या समस्या, व्यावसायिक महाविद्यालयांचे प्रवेश, प्रशासनिक बदल्या, मिहान प्रकल्प, दवाखान्यातील अव्यवस्था, नगर भूमापन विभाग, या समस्यांची निवेदने नागरिकांनी दिली. या जनसंपर्क कार्यक्रमात शेकडोे नागरिकांची निवेदने जनसंपर्क कार्यालयाकडे जमा झाली आहेत. सकाळी 10.30 वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम दुपारपर्यंत सुरु होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Water Monitoring Program by Green Vigil Foundation.

Thu Aug 25 , 2022
Nagpur – Like every year, Green Vigil Foundation,a Nagpur based environment NGO conducted pre-ganpati visarjan lake monitoring program of four major lakes namely Futala, Gandhisagar, Sonegaon & Sakkardara. Since last 10 years, Green Vigil is conducting lake monitoring campaign along with Earth Echo International, an international NGO who is publishing year book each year by compiling data of surface water […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com