-महापौर दयाशंकर तिवारी यांचा महत्वपूर्ण निर्णय : सर्वसाधारण सभेमध्ये दिले निर्देश
नागपूर : नागपूर महानगरपालिकेमधील स्टेशनरी घोटाळ्याच्या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनपातील स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्याचे निर्देश त्यांनी शुक्रवारी (ता.३१) झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये दिले
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आणि माजी स्थायी समिती सभापती ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेअंती महापौरांनी उपरोक्त निर्देश दिले.
महानगरपालिका अधिनियम ३१ अन्वये महापौरांनी ही समिती गठीत केली. महापौरांद्वारे गठीत समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे राहतील. समितीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका वैशाली नारनवरे, नगरसेवक अॅड. संजय बालपांडे यांचा समावेश आहे.
महानगरपालिका अधिनियम ३१ नुसार समितीला चौकशीसाठी बाहेरील व्यक्तींची नियुक्ती करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार ते या समितीला सात सदस्यीय करून त्यात निवृत्त न्यायाधीश, निवृत्त लेखापाल, निवृत्त शासकीय अधिकारी यांना अंतर्भूत करू शकतात.
नागपूर महानगरपालिकेमध्ये उघडकीस आलेल्या स्टेशनरी घोटाळ्यासंदर्भात येत्या एक महिन्यात अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. घोटाळ्यात सहभागी पाच एजन्सीचे मनपामध्ये नोंदणी झाल्यापासूनच्या कारभाराची चौकशीही करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात दिले.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com