स्टेशनरी घोटाळा सर्व विभागांच्या चौकशीसाठी समिती देणार पोलिस आयुक्तांना पत्र

-मनपा आयुक्तांना ही पोलिस आयुक्तांना पत्र देण्याचे निर्देश

नागपूर, ता. १७ : मनपाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागात झालेली आर्थिक अनियमितता व कार्यपद्धतीतील भ्रष्ट आचरणाची सदर पोलिस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र अशा प्रकारची अनियमितता आरोग्य विभागाव्यतिरिक्त अन्य विभागातही असू शकते. त्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व विभागांतील व्यवहारांची चौकशी करण्याकरिता पोलिस आयुक्तांना पत्र द्यावे, असे निर्देश स्टेशनरी घोटाळा चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिले. तसेच चौकशी समितीमार्फत पोलिस आयुक्तांना सर्व विभागांची चौकशी करण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

            सोमवारी (ता. १७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात स्टेशनरी घोटाळ्यासंबंधी नियुक्त चौकशी समितीच्या कामकाजाचे प्रारूप ठरविण्यासंबंधी बैठक पार पडली. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, सदस्य तानाजी वनवे, ॲड. संजय बालपांडे, संदीप जाधव, सदस्या वैशाली नारनवरे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, सहायक विधी अधिकारी प्रकाश बरडे, सूरज परवचे उपस्थित होते.

            यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे म्हणाले, आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी तक्रार केली. त्यामुळे आरोग्य विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी पोलिस करीत आहेत. मात्र मनपाच्या सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग, ग्रंथालय, जन्म-मृत्यू विभागातसुद्धा स्टेशनरी घोटाळा झाला असल्याची भीती ३१ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सभागृहात पदाधिकारी व नगरसेवकांनी वर्तविली. त्यामुळे या विभागांतील व्यवहाराची  चौकशीसुद्धा करण्यात यावी. यासंबंधीचे चौकशी पत्र आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना द्यावे,  असे निर्देश यावेळी अविनाश ठाकरे यांनी दिले.

            चौकशी समितीची ही पहिलीच बैठक असून समितीमध्ये आणखी दोन सदस्य नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. यात एक सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वित्त विभागातील जाणकार सेवानिवृत्त अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या नियुक्ती संदर्भात समितीचे सदस्य ॲड. संजय बालपांडे पुढील दोन दिवसात नावे सुचविणार आहेत. तसेच वित्त विभागातील मागील ५-६ वर्षात सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची यादी निगम सचिवांकडून मागविण्यात आली आहे.

            समितीला लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता आणि गोपनीयता ठेवण्यासाठी समितीचे सचिव म्हणून उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. मनपा उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील बैठक दोन दिवसात घेणार असल्याचे यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्रभाग-1 में नारा दहन घाट के सौंदर्यीकरण एवं विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन

Mon Jan 17 , 2022
नागपुर – प्रभाग-1  नारा दहन घाट का पूर्व स्थायी समिति अध्यक्ष वीरेंद्रजी कुकरेजा की 1 करोड़ 12 लाख की निधि से नारा घाट का सौन्दरिकरण व कुछ चीजों का लोकार्पण का भूमिपूजन संपन्न हुआ इस कार्यक्रम में सर्वप्रथम संत साई लच्छुरामजी व संत दामोदरजी के द्वारा पूजा-अर्चना हुई तथा पूर्व आमदार मिलिंदजी माने व मंडल अध्यक्ष संजयजी चौधरी तथा चारों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com