नागपुरात महात्मा गांधी पुतळ्यासमोर अघोषित आणीबाणी विरोधात आप चा सत्याग्रह
नागपूर:- सीबीआयने रविवार, १६ एप्रिल रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर सत्याग्रह करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन व मनीष सिसोदिया यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांना कारण नसतांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. एकूणच सी बी आय च्या माध्यमातून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आजचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचूरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सत्याग्रह करण्यात आला.
नागपुरात व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात व नागपूर संयोजक कविता सिंघल, विदर्भ सहसंयोजक अमरीश सावरकर, पूर्व विदर्भ सहसंयोजक संजय हेडाऊ, विदर्भ हेल्थविंग संयोजक डॉ शाहिद अली जाफरी, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, राकेश उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह करण्यात आला. दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य तसेच मोफत वीज पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जन मान्यता मिळत आहे. यापूर्वीच जगभर त्यांच्या कामाची स्तुती होत आली आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे असे यावेळेस विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखडे यांनी सांगितले
दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांनी यावेळेस केला.
मोदी सरकार तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा या दोघांच्या मदतीने त्यांच्या विरोधातील आवाज दडपण्याचं काम करीत आहे. ज्या मद्यअबकारी धोरणाचा संदर्भ घेतला जात आहे, तेच मद्य विक्री धोरण पंजाब मध्ये जसेच्या तसे लागू करण्यात आलेले असून तेथे तब्बल ४० टक्क्याहून अधिक उत्पन्न वाढले आहे. या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा अनेकांवरती दबाव आणून त्यांना हवी तशी साक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. अबकारी धोरण हे निमित्तमात्र असून मोदी सरकारला केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची धास्ती वाटत असल्यानेच हे दडपशाहीचे धोरण राबवले जात आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे. त्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल असे राज्य सहसचिव अशोक मिश्रा यांनी म्हटले.
आजच्या सत्याग्रहात मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आजच्या सत्याग्रहात प्रामुख्याने मध्य नागपूर प्रभारी अजिंक्य कळंबे, विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, अजय धर्मे, मनोज दफरे, श्रीकांत कामडी, अभिजीत झा, लक्ष्मीकांत दांडेकर, प्रदीप पौनिकर, डॉ.अमेय नारनवरे, आकाश कावळे, जॉय बांगडकर, महेश बावनकुळे, हरीश गुरबानी, सुरेश खर्चे, प्रभात अग्रवाल सचिन पारधी,श्याम बोकेडे, उमाकांत बनसोड, सोनु फटिंग, धीरज आगाशे, संजय जीवतोडे, क्रुताल आकरे, गौतम कावरे, सुनील म्याथ्यु, पियुष आकरे, स्वप्निल सोंमकुवर, पंकज मेश्राम, इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्तीत होते.
संदीप कोवें, बनसोड, गौरव रामटेके, संजय लेंडारे, आकाश वैद्य, रजत शेवाळे,प्रफुल कुमकुमवार, स्वप्नील दत्ता,राजेश तिवारी,राजू देशमुख,दुर्योधन ममिडवार,निखिल मेंढवाडे, चंद्रशेखर पराड,विनायक पाटील,शुभम पराळे,धीरज नगरकर, विनायक साखरकर,पवन तामगाडगे,प्रणित कडू, शैलेश गजभिये, मानसिंग अहिरवार, नासीर शेख, चैताली रामटेके, विजय नंदनवार, शुभम मोरे, श्रुती ठाकरे, संजय चांदेकर, मोरेश्वर मौंदेकर, वरून ठाकूर, रविंद्र गिडोले, अनिल संभे, विकास घरडे, नवनीत बेलसरे, देवेंद्र जांभूळकर, सोनल मेश्राम, सचिन चारोटे, शिरीष तिडके, प्रवीण चौधरी, कुन्दन कानफड़े , मंजेश डांगरे , चमन बामनले ,प्रशांत मेश्राम, भरत जवादे, अमित पीसे, रामलखन दिवादी, गिरेश तितरमारे, गिरिजाशंकर चौधरी, बभू भाई पटेल काका, दिलीप बिड़कर, पुष्प डाभरे, विजय परजपति, गुडडू मिश्रा, मनीष बावरिया, शशिकांत रायपुरे , कपिल भावरे, यश भवरिया, राजा डोंगरे, कुणाल दलसकर, परमवीर सिंग , लोकेश लौंडे, निशात गोंदे , रजत जीभकाटे, गौरव काटे, बदल डोंगरे, कृष्ण वानखेडे, विक्की वानखेडे , विष्णु थोरात , संजय जिचकर, रविन्द्र वासनिक, कुंदन भिमटे, राकेश उराडे, प्रशांत टाकोटे, कमलेश भदाडे, नामदेव कामडी, मोहन मंगर, डॉ. राजेश दवे , बबलु मोहाडीकर, बाबा शेख, इशांत मोरघडे, जिनेश शाह, कमलाकर जारीत, सीमा हरिजन, अनिल खवासे, यश बिनझाडे. वैभव गोटे, रोहित उदीरवाड़े, रोहित मुदलकर, राहुल वाढई, देवेन्द्र समर्थ, अमन देशभरता, रजत सेवाले, गौरव रामटेके, स्वपनिल तपोवन, सचिन सिंगारे, प्रफुल कुमकुलवार, आयूश थापा, रिजवान शेख, रिकी, सोनू गुप्ता, अश्विन भगत, सागर जैस्वाल, संजय बारापात्रे, चेतन निखारे, हरीश वेळेकर, विनोद गौर, संगिता स्नान, रोशनी गौर, दिपक भातखोरे, देवेंद्र समर्थ, अनुप खडतकर, राहुल वडे, देवा महेशकर, वासनिक जी, सलीम शेख, श्रीकांत पोहाळे, सचिन गोडे, प्रकाश मेंधेकर, शुभम उमरेडकर, संजय पौनिकर, नरेंद्र पडाले निलय गाडीकर, ऋषिकेश नागोसे, सुभाष भगत इत्यादी मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.