नरखेड तालुका प्रतिनिधी :- नगर परिषद महाविद्यालय मोवाडच्या आयक्यूएसी, विभागाद्वारे व इंडियन स्टुडंट कॉन्शिल महाराष्ट्र आणि के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्टस,तसेच एन. जी. बेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने नविन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले प्रस्तुत वेबिनार प्राचार्य डाँ, किशोर झिलपे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या वेबिनार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हूणन के. जी. जोशी कॉलेजच्या प्राचार्य डाँ, सुचित्रा नाईक तर प्रमुख वक्ते म्हूणन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्राध्यापक डाँ, दिलीप चव्हाण लाभले होते.
या राज्यस्तरीय वेबिनार मध्ये नविन शैक्षणिक धोरणामध्ये दोन्हीही बाजूनी सविस्तर चर्चा करण्यात आली महाविद्यालयाचे कलस्टर, चार वर्षीय पदवी कोर्स, व्ही.ए.सी. या अनुषंगाने करावयाची तयारी व आव्हाने यावर विस्तृत मार्गदर्शन मान्यवराच्या मार्फत करण्यात आले सदर राज्यस्तरीय वेबिनारला संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे संचालन डाँ, भारती गायकवाड, प्रास्ताविक डाँ, ज्ञानोबा कदम, डाँ, माधुरी राऊत, तर आभार सुनील नारनवरे यांनी मानले.