कोदामेंढीत आजपासून राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

कोदामेंढी :-  विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, विदर्भ ऑलंपीक असोसिएशन यांच्या माध्यमाने आणि उडान स्पोर्टस पॉवर लिफ्टिंग यांच्या सौजन्याने कोदामेंढी येथे राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग (शक्ती तोलन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

१ मे ते ३ मे रोजी या स्पर्धा श्रीमती राजेश्वरी रेड्डी स्कॉलर कान्वेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. विविध जिल्ह्यातील राज्यभऱ्यातून खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असून सब ज्युनिअर आणि ज्युनिअर मूल मुलीच्या विविध गटातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्कॉट, बेंच, प्रेस, डेड लिफ्ट आणि पॉवरलिफ्टिंग आदी प्रकारच्या स्पर्धा होणार.

१ मे रोजी सोमवारला सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन ऑनलाईन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, विशेष अतिथि म्हणून विधानपरिषदेचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे असून माजी क्रीडामंत्री सुनील केदार, रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आदिसह गाव,तालुका, जिल्हा परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनपूर्वी गावातून ढोल ताशाच्या गजरात महारॅली काढण्यात येणार आहे.सोहळा (ता. ३) रोजी सायंकाळी ५ वाजता उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोरया फाउंडेशन च्यावतीने पाखरांसाठी मोहन मते यांच्या हस्ते जलपात्र वितरण

Mon May 1 , 2023
श्रीराम नगर येथील बुद्धविहाराच्या समस्या व सौंदर्य करणाची मागणीचे निवेदन  नागपुर :- मोरया फाउंडेशन तर्फे दरवर्षी उन्हाळ्यात पक्षा साठी जल पात्र वितरीत करण्यात येते. या वर्षी हा कार्यक्रम रमाई बुद्धविहार श्रीराम नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण चे आमदार मोहन मते यांची उपस्थिती होती. यावेळी रमाई बुद्ध विहार परीसरातील समस्या आणि सौंदर्यीकरणाचा मुद्दा नागरिकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com