राज्यातील ४० उत्कृष्ट डॉक्टर्स व समाजरत्न राजभवन येथे सन्मानित राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान

सुभाष सिक्रेट‘ पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे देखील केले प्रकाशन

पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार‘ प्रदान करण्यात आले.

पुणे येथील कर्तव्यम सोशल फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक संतोष बारणे व सचिव क्रांतीकुमार महाजन उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी क्रांतीकुमार महाजन यांनी लिहिलेल्या सुभाष सिक्रेट‘ या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे होत असताना सुभाष सिक्रेट‘ हे पुस्तक नव्याने वाचकांसमोर येत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

केवळ शांतीने स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही तर त्यासाठी क्रांती देखील करावी लागेल या विचारांनी प्रेरित होऊन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना तयार केली. तुम मुझे खून दोमैं तुम्हे आजादी दूंगा‘ असा प्रेरणादायी मंत्र त्यांनी देशवासियांना दिला असे राज्यपालांनी सांगितले.

करोना संसर्गाच्या काळात डॉक्टर्सनर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून रुग्णांचे जीव वाचवले तसेच समाज सेवकांनी दयादान व धर्म या शाश्वत मूल्यांचा परिचय देत जनता जनार्दनाची सेवा केल्यामुळे देश या महा संकटातून सहिसलामत बाहेर पडलाअसे राज्यपालांनी सांगितले.

आपले काम समाजसेवेच्या भावनेने केल्यास ते काम पुण्यप्रद ठरतेअसे राज्यपालांनी सांगितले व सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

यावेळी अध्यक्ष संतोष बारणे यांनी प्रास्ताविक केले तर क्रांती महाजन यांनी पुस्तका मागची भूमिका सांगितली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी उज्जवलकुमार भिमराव चव्हाणडॉ. नेमजी करमशी गंगरडॉ. शेख अख्तर हसन अलीडॉ. अलका भरत नाईकसूर्यकांत महादेव गोवळेअशोक शेषराव शिंदेडॉ. सुनिल मारूती चव्हाणसागर रतनकुमार कवडेयशवंत रामदासजी कुर्वेभास्कर निंबा अमृतसागरमोहम्मद रियाज शेखरामु वसंत पागीसुनिल नंदलाल सिंग,  दामोदर यशवंत घाणेकरवसंतराव मारोतराव धाडवेप्रतिभा जयंत भिडेडॉ. यतीन त्र्यंबक वाघडॉ. वर्षा नितीन देशमुखभाऊसाहेब संभाजी कोकाटेडॉ. किशोर संतोष पाटील डॉ. रमेश उत्तमराव गोटखडेयशपाल भाऊराव वरठेडॉ. सुकन्या सुब्रम्हण्यम् भटडॉ. निलय ग्यानचंदजी जैनबंडू भाऊराव मोरेरामदास तुकाराम कोकरेसोमनाथ रामेश्वर वैद्यप्रमोद सखाराम धुर्वेसुरेश मारूती कोतेडॉ. अनिल गोपीनाथ रोडेरोशन भगवान मराठेजगन्नाथ सखाराम शिंदेअमित गणपत गोरखेश्रीमती जोत्सना शिंदे-पवारआशिष शिवनारायण श्रीवास व श्रीमती आरती रणजितसिंह सचदेव यांना कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Tue Feb 22 , 2022
नागपूर, ता. २२ :  नागपूर महानगरपालिके तर्फे मंगळवारी (२२ फेब्रुवारी) रोजी ०२ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी (ता.२२) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ, व्ही.आय.पी.रोड, रामदासपेठ येथील यम्मी ‍पिझझा रेस्टॉरेन्ट यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत कोल्बास्वामी नगर येथील ललीत सावतकर यांच्या विरूध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com