नागपूर :- शहरातील बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाही , काही ठिकाणी शौचालयाला दरवाजे नाही, आहे ती तुटलेल्या अवस्थेत आहे , पाणी नसल्यामुळे अत्यंत घाण परिस्थितीमध्ये महिला स्वच्छालय आहे. भरपूर अशा महिला शौचालय मध्ये असामाजिक तत्त्वाचे लोक येऊन बसतात त्यामुळे महिला स्वच्छतेमध्ये जाऊ शकत नाही जिल्हा संघटिका मनीषा पापडकर यांनी सह आयुक्त राम जोशी यांना विनंती केली की अशा ठिकाणी आपण कडक कारवाई करून त्या ठिकाणी महिलांची नियुक्ती करावी. तसेच वर्दळीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये इ टॉयलेट प्रणाली सुरू करावी, आज आपलं शहर स्वच्छ व सुंदर नागपूर म्हणून गणल्या जातं परंतु शौचालय बघून अजूनही आपण ग्रामीणमध्ये किंवा आदिवासी भागात राहत असल्याची जाणीव निर्माण होते. G 20 अंतर्गत आपल्या नागपूर शहराचे सौंदर्यकरणं सुरू आहे तसेच महिला स्वच्छतागृह सुद्धा सुंदर आणि स्वच्छ दिसायला पाहिजे त्यामुळे महिलांचे आरोग्य सुदृढ राहील. यावेळी जिल्हा संघटिका मनिषा पापडकर, उपजिल्हा संघटिका गायत्री वैद्य, दक्षिण विधानसभा संघटिका मंजुषा पानबुडे , विभाग प्रमुख अर्चना कडू विभाग प्रमुख पुनम चाडगे , प्रभाग प्रमुख श्वेता कोठेकर अनेक शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते.
वर्दळीच्या ठिकाणी महिलांसाठी ई टायलेट सुरू करा, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांची मागणी.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com