नागपूर :- भारतातील आघाडीचे टेक एनेबल्ड मल्टी- स्पोर्ट ग्रासरूट कॉम्पिटिशन प्लॅटफॉर्म असलेले स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) देशभरात ग्रासरूट (तळागाळातील) पातळीवर खेळांना प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. भारताच्या स्पोर्ट्स डीएनएला बळकट करण्याच्या बांधिलकीसह आणि भरभराट होत चाललेल्या क्रीडा संस्कृतीसाठी सरकारच्या ध्येयाला पाठिंबा देण्यावर दृढ लक्ष केंद्रित करून एसएफए नागपूर मध्ये आपले स्थान आणखी विस्तारत आहे.
देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्रीडा उपक्रमांना सक्षम करणे आणि एसएफए चॅम्पियनशिपद्वारे एक मजबूत स्पोर्ट इकोसिस्टीम तयार करणे हे एसएफए चे मुख्य उद्दिष्ट आहे. स्थापनेपासून गेल्या ८ वर्षांत, एसएफएने १२ एसएफए चॅम्पियनशिपच्या माध्यमातून २००,००० क्रीडापटूंसाठी टेक आईपी कौशल्य सक्षम केले आहे. याशिवाय, ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, गुजरात, २०२२ आणि खेलो इंडिया युथ गेम्स, हरियाणा, २०२१ हे एसएफएच्या टेक आईपी गेम्स मैनेजमेंट सिस्टमद्वारे समर्थित होत्या. २०२३ मध्ये, एसएफएने पुढील ५ वर्षांसाठी खेलो इंडिया युथ गेम्स, मध्य प्रदेश येथील स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम स्वीकारले आहे.
एसएफएचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर (सीएसओ) रुबेन पांडियन म्हणाले, “भारताच्या स्पोर्ट्स डीएनएला बळकट करण्याच्या समान दृष्टीकोनातून प्रेरित होत भारताच्या ग्रासरूट पातळीवर स्पोर्ट इकोसिस्टीम मध्ये क्रांती घडवण्याचे आमचे ध्येय आहे. शालेय खेळ हा आजच्या तरुणांमध्ये शिस्त, खिलाडूवृत्ती आणि चिकाटी वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. एक निरोगी राष्ट्राचा पाया यातून घातला जातो. तंत्रज्ञान आणि तरुण खेळाडूंसाठी एक महत्त्वाकांक्षी प्लॅटफॉर्म यांचा मिलाफ करून एसएफए भारतात शालेय खेळांकडे कसे पाहिले जाते यात परिवर्तन करत आहे. शालेय स्तरावरील क्रीडापटूंना ऑलिम्पिक-स्तरावरील स्पर्धेत खेळण्याचा थरार अनुभवायला देत भविष्यातील ऑलिम्पिकपटू बनण्याच्या त्यांच्या प्रवासाची सुरुवात आम्ही करून देऊ हे सुनिश्चित करत आहोत.”
२०२३ मध्ये एसएफए २ लाख खेळाडूंना ४ महिन्यांच्या कालावधीत १० एसएफए चॅम्पियनशिप खेळण्यासाठी प्रोत्साहित करेल. टेक आणि डेटा अॅनालिटिक्समधील क्षमतांद्वारे शालेय स्तरावरील क्रीडा क्षमता शोधण्यासाठी आणि भविष्यातील चॅम्पियन घडवण्यासाठी एसएफए चॅम्पियनशिपला प्रमुख यंत्रणा बनवण्याचा दृष्टीकोन आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून, कामगिरीचे व्हिडिओ आणि डेटा विश्लेषणे रेकॉर्ड करून, शहरा-शहरातून एसएफए भारतातील खेळांसाठी प्रथम क्रमांकाची शाळा शोधण्याच्या मोहिमेवर आहे.
एसएफएचे सीओओ राजस जोशी पुढे म्हणाले, “स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) भविष्यातील चॅम्पियन शोधण्यासाठी खेळांमध्ये प्रवेशाचे सार्वत्रिकीकरण करत आहे. मल्टी- स्पोर्ट प्रतिभांचा शोध, प्रशिक्षण आणि सक्षमीकरण करेल असा एक एकत्रित प्लॅटफॉर्म पुरविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. शालेय स्तरावर कार्यक्षमतेचे मूल्यांकन आणि वाढ करण्यासाठी तंत्रज्ञान आणि व्हिज्युअल आशय यांचे एकत्रित सामर्थ्य आणून आम्ही खेळाडूच्या संपूर्ण क्रीडा प्रवासात त्याला पाठबळ देऊ. एसएफए चॅम्पियनशिपच्या मागील १२ सत्रामधून आम्ही ४,००० हून अधिक शाळांमधून २ लाखांहून अधिक खेळाडूंना सहभागासाठी प्रोत्साहित केले आहे.