लाडकी लेक भव्य रोजगार मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद

– 25 कंपन्यांनी नोंदविला सहभाग : नियुक्त महिलांना तात्काळ नियुक्तीपत्र प्रदान 

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात सोमवारी (ता.10) लाडकी लेक भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गशनाखाली महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्या अंतर्गत महिलांना रोजगार आणि नोकरीची संधी मिळावी याकरिता सोमवारी लाडकी लेक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी महिला उमेदवारांकडून या मेळाव्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यात 1700 महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी 252 महिला उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

नागपूर महागरपालिका आणि निष्कान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाडकी लेक भव्य रोजगार मेळाव्यात ॲक्सिस बँक(आयबीएफ), एलआयसी यासारख्या 25 कंपन्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये नागपूर, पुणे, मुंबईमधील बँकिंग, फायनान्स, ऑटोमोबाईल, बीपीओ, फार्मा, शैक्षणिक, इंशुरन्स, नर्सिंग क्षेत्रातील कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला. वर्ग 5 पासून ते उच्चशिक्षित मुलीं/महिलांनी लाडकी लेक भव्य रोजगार मेळावात भाग घेतला. या मेळाव्यात महिलांना नोकरीचे ऑफर लेटर प्रदान करण्यात आले. यावेळी निष्कानचे दिपक पवार, किरण रहाणे, अमोल उंडे यांची उपस्थिती होती. मनपा तर्फे उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नुतन मोरे आणि प्रमोद खोब्रागडे उपस्थित होते.

लाडकी लेक भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी कंपन्या

POUSSE मॅनेजमेंट सर्विस, नोव्हो कॅरियर प्रायव्हेट लिमिटेड, पटेल ग्रुप ॲण्ड टाटा स्ट्राईव्ह, एज्यु स्किल, सेफ्वा फाउंडेशन, एचडीएफसी (आयबीएफ), ॲक्सिस बँक (आयबीएफ), एलआयसी, अपग्रेड एज्युकेशन, कॅलिबेहएचआर प्रायव्हेट लिमिटेड,लाईटहाऊस कम्युनिटी सर्विस, युनिगायडन्स प्रा. लि., सुनसूर सृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फ्यूजन प्रायव्हेट लिमिटेड, स्विगी इंस्टा मार्ट, प्रोव्हिजनल लाईफस्टाईल (तनिष्का), मेधावी एस्पायर प्रा. लि., क्रायस्टायल फर्निटेक प्रा. लि., सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट, अश्पा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि., महिंद्रा ॲण्ड महिंद्रा., टॉपबॅण्ड, एडसपार्क इंटरनॅशनल प्रा.लि., ईफिमन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सायबरॅथॉन टेक्नॉलॉजी, हितेश कंन्सलटंट सर्विस, अंश एचआर इंस्टिटयूट या कंपन्याचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

होळी (धुलिवंदन) सणानिमित्य शहरबसेस बंद ठेवण्याबाबत

Tue Mar 11 , 2025
नागपूर :- होळी (धुलिवंदन) सणानिमित्य दि. 13/03/2025 रोजी सांयकाळी 07:00 वा. पासुन ते दि. 14/03/2025 ला संपुर्ण दिवस शहरबस सेवा बंद राहील. दि. 15/03/2025 पासुन बसेसची वाहतुक पुर्ववत प्रमाणे सुरु राहील. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!