नागपूर :- भगिनी मंडळा तर्फे श्रावणधारा अंतर्गत घेण्यात आलेली नाट्यछटा स्पर्धा नुकतीच पार पडली. ह्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह्या स्पर्धेला अभय बाळदे व अधिश्री देशपांडे हे परीक्षक होते. पन्ना दाई साकार केलेल्या प्रचिती धोंड ह्यांना पाहिले पारितोषक मिळाले. तर संशय कल्लोळ मधील कृतिका साकार केलेल्या गौरी बेलन ह्या दुसऱ्या आल्या. तर सरिता जयपुरकर व शितल सोनवणे ह्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या स्पर्धेचा आनंद सर्वांनी घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.