संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- युवक काँग्रेस महाराष्ट्रचे पुर्व महासचिव मोहम्मद इरशाद शेख च्या वतीने हाजी अब्दुल रहमान कुरैशी (रहमान पहलवान) यांच्या स्मरणार्थ युवक कांग्रेस चे पूर्व महाराष्ट्र प्रदेश महासचिव इर्शाद शेख यांच्या वतीने झंडा चौक ,कादर झेंडा स्थित इंदिरा हायस्कुल येथे आयोजित भव्य मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून हजारोच्या संख्येतील लाभार्थ्यांनी या मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात बीपी,शुगर, ईसीजी ची मोफत तपासणी करण्यात आली तसेच रोग संबंधित औषध सुद्धा मोफत वितरित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा क्षेत्रचे नेता व जिला परिषद नागपुरचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या शिबिराला सेफ्क्योर हास्पिटल चे नामवंत एमबीबीएस च्या वैद्यकिय चमूने वैद्यकीय सेवा पुरविली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नागपुर जिला ग्रामीण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहम्मद राशिद अंसारी, जिला युवा काँग्रेस महासचिव मो.सलमान यांनी मोलाची भूमिका साकारली याप्रसंगी प्रामुख्याने कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, मीर आरीफ अली ,राजकुमार गेडाम , मिथिलेश कन्हेरे,सलामत अली, निखिल फलकें,सिराज भाटी, आशिष मेश्राम,साजीद अंसारी, इरफान अहमद,आनंद खोब्रागड़े, सुरैया बानो, कुसुम खोबरागड़े,अंबीका रामटेके,विभा मेश्राम, ज्योति कारेमोरे,इसरत आरा, रुक्मणि,प्रकाश लाईन पांडे,अरशद खान, अम्मार अंसारी,अहफाज खान आदि मान्यवर उपस्थित होते.