– प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नोंदविले ५० सदस्य
नागपूर :- भारतीय जनता पार्टी द्वारे सुरु असलेल्या सदस्यता नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी महत्वाची भूमिका नोंदवून ५० सदस्यांची नोंदणी केली.
देशाचे दूरदर्शी नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या प्रगतीची घोडदौड सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्र, विदर्भ आणि नागपूरने विकासाची मोठी उंची गाठली आहे. भारतीय जनता पार्टीच्या या विकासाभिमूख नेतृत्वावर विश्वास दाखवून अनेक जण पक्षाचे सदस्यत्व स्वीकारत आहेत.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नाने पूर्व नागपुरातील पँथर नगर, तुलसी नगर, नंदनवन, पडोळे नगर, शांती नगर, हिवरी नगर, पवनशक्ती नगर, कुंभार टोली या भागातील ५० सदस्यांनी नोंदणी केली. लालू शाहू, नरेंद्र खोब्रागडे, पंचशीला गजभिये, कुलदीप वरखडे, कपिल वासनिक, विनय गुप्ता, मोसमी वासनिक, रुपचंद गेडाम, आम्रपाली खोब्रागडे, सिद्धांत गायकवाड, राजकुमार गुप्ता, शेषराव गजघाटे, किरण गजभिये, किशोर सायगन, जीत पटेल, उदय पटेल, राम सामंत, विक्रम डुंबरे, अंकित कायरकर, लोकेश मेश्राम आदींनी सदस्यता नोंदणी केली.
प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.