आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली :- मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज गडचिरोली येथे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळे, दंत, कान, नाक व घसा, हिमोग्लोबिन, सिबीसी, लिपिड प्रोफाइल, लिव्हर फंक्शन, एच.आय.व्ही. आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच ईसीजी आणि सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. इच्छुक पत्रकारांनी रक्तदानही केले. यावेळी पत्रकारांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आभा कार्ड काढून देण्यात आले.

बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

शिबिराची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सतीश सोळंके होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी आजच्या डिजिटल युगात पत्रकारांचे काम 24 तास सुरू राहत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला असल्याने त्यांची नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकारांसाठी हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, अविनाश भांडेकर, संजय तिपाले, व्यंकटेश दुडमवार, मनोज ताजने, सुमित पाकलवार, आशिष अग्रवाल, मनिष रक्षमवार, मिलिंद उमरे, रूपराज वाकोडे, सुरेश नगराळे, मुकुंद जोशी, रेखा वंजारी, मुनिश्वर बोरकर, विवेक मेटे, तन्मय देशपांडे, अनुप मेश्राम, तिलोतमा हाजरा, स्वाती बसेना, प्रवीण चन्नावार, संदीप कांबळे, निलेश सातपुते, जगदीश कन्नाके, हस्ते भगत, राजेश खोब्रागडे, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन उदय धकाते यांनी केले. यावेळी स्वच्छेने रक्तदान करणारे वामन खंडाइत यांना गौरविण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीष मेश्राम, डॉ. जितेंद्र डोलारे, डॉ. मृणाली रामटेके, डॉ. मुकुंद डभाले, डॉ. अजय कांबळे, डॉ. बाळू सहारे, रोहण कुमरे, माणिक मानसपुरे, डॉ. शान गोंडा, अधिपरिचरिका आशा बावणे, प्रणाली ठेंगणे, शिल्पा मेश्राम, शिल्पा सरकार, वैशाली बोबाटे, शितल काळबांधे, प्रयोगशाळा सहाय्यक रोशनी सिंग तसेच माहिती कार्यालयातील महादेव बसेना, दिनेश वरखेडे, वामन खंडाइत, गुरूदास गेडाम आदींनी विशेष सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गडचिरोली येथे आंबा आणि अ‍ॅव्होकॅडो लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न

Fri Feb 21 , 2025
गडचिरोली :- गडचिरोली कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास मंडळ व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा नियोजन भवन येथे एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. वाय. आर. खोब्रागडे, सहयोगी प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र, सोनापूर, गडचिरोली तसेच भालचंद्र ठाकूर, प्रगतशील अनुभवी शेतकरी, गोंदिया यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!