स्पेशल लोकल व मेमो लोकल रेल्वेगाड्या झाल्या पूर्ववत सुरू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कोरोना काळात मुंबई हावडा रेल्वेमार्गावरील कामठी रेल्वे स्टेशन वरून धावणाऱ्या सर्वसामान्यांच्या लोकल व मेमो प्रवासी गाड्या मागील अडीच वर्षांपासून बंद होत्या त्यामुळे नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.बहुतेक मजूर बेरोजगार झाले होते मात्र काल पासून बंद असलेल्या स्पेशल लोकल व मेमो प्रवासी गाड्या पूर्ववत पद्धतीने सुरू झाल्याने प्रवासी वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

कामठी रेल्वे स्टेशन मार्गावरून दैनंदीन 30 रेल्वे गाड्या धावत असून प्रवासी सेवा पुरवीत आहेत .कोरोना काळात या मार्गावरून धावणाऱ्या स्पेशल लोकल प्रवासी व मेमो या रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने बंद केल्या होत्या त्यानंतर विशेष एक्सप्रेस प्रवासी गाड्या व त्यानंतर च्या पुढील काळात रेल्वे प्रशासनाने बोटावर मोजण्या इतक्या लोकल व प्रवासी गाड्या सुरू केल्या होत्या.मात्र काल पासून बंद असलेल्या चार लोकल मेमो रेल्वेगाड्या पूर्ववत पद्धतीने सुरू करण्यात आल्या ज्यामध्ये डोंगरगढ-इतवारी,इतवारी- डोंगरगढ,इतवारी -बालाघाट-बालाघाट इतवारी चा समावेश आहे

कामठी रेल्वे स्थानकाहुन गोंदिया मार्गाकडे जाणारी सकाळची लोकल व मेमो गाडी कायम बंद असल्याने शासकीय तसेच व्यावसायिक व खाजगी कामानिमित्त ये जा करणारे कर्मचारी ना नाहक त्रास भोगावे लागले तर कित्येक बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या योग्य निर्णयातून बंद केलेल्या स्पेशल लोकल व मेमो प्रवासी गाड्या पूर्ववत पद्धतीने सुरू केल्याच्या निर्णयातून काल पासून कामठी रेल्वे स्थानकावर चार स्पेशल मेमो व लोकल प्रवासी गाड्या पूर्ववत पद्धतीने सुरू करण्यात आल्या.त्यानुसार डोंगरगढ-इतवारी स्पेशल मेमो ही रेल्वेगाडी कामठी रेल्वे स्थानकावर सकाळी 8.38वाजता येईल व दोन मिनिटं थांबा देत सकाळी 8-40ला इतवारी कडे रवाना होईल.इतवारी-बालाघाट स्पेशल मेमो सकाळी 10-57 ला कामठी रेल्वे स्टेशन वर येईल व एक मिनिटं थांबा देऊन 10-58 ला बालाघाट कडे प्रस्थान करेल.

इतवारी कडून डोंगरगढ कडे जाणारी स्पेशल मेमो रेल्वेगाडी ही सायंकाळी 6 .52 वाजता कामठी रेल्वेस्थानकावर आगमन करेल तर दोन मिनिटं थांबा घेतल्या नंतर 6.54 वाजता डोंगरगढकडे प्रस्थान होईल.तसेच बालाघाट हुन इतवारी कडे जाणारी स्पेशल मेमो कामठी स्थानकावर सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी येऊन एक मिनिटं थांबा देत सहा वाजून पाच मिनिटांनी प्रस्थान करेल.रेल्वे प्रशासनाने चांगला निर्णय घेत जनसामान्यांसाठी सोयीचे होणारे रेल्वे प्रवासी बंद पडलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत पद्धतीने सुरू केल्या बद्दल कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष नीरज यादव, माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर, माजी उपाध्यक्ष अजय कदम, काशिनाथ प्रधान, माजी नगरसेवक प्रतीक पडोळे,माजी नगरसेवक नीरज लोणारे, माजी नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक कपिल गायधने, विकास रंगारी,प्रमोद उर्फ दादा कांबळे, रघुवीर मेश्राम,राजेश कांबळे,राजेश गजभिये, दिपंकर गणवीर, दिनेश पाटील,आशिष मेश्राम ,अनुभव पाटील,उदास बन्सोड, गीतेश सुखदेवें,प्रमोद खोब्रागडे,कोमल लेंढारे,रायभान गजभिये, मनोज रंगारी,राजन मेश्राम आदींनी स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष सह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Surgery by Dr Nawkhare gives a new life to a 25 year old

Mon Apr 24 , 2023
Nagpur :-25 years old male’s dreams were shattered when he met an accident at Chhindwara bypass. He was brought to Neurosys Multispeciality centre, Ramdaspeth Nagpur after the accident. The accident left him quadriplegic and he was unable to move any of his limbs. He had severe spinal cord injury with complete loss of power. He was taken to the operation […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com