संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मानवी जीवनासाठी तुळशी ही वनस्पति एक वरदान ठरली असून आरोग्य चांगले होण्यासाठी तुळशिचा नेहमीच उपयोग होत आहे त्यामुळेच पारंपरिक पद्धतीने तुळशिचे झाड़ अंगनात लावन्याची प्रथा आजही कायम आहै. दिवाळीनन्तर पावसाळ्याचा ऋतु संपताच शरद व हेमंत ऋतुच्या आगमना बरोबरच स्त्री पुरुषाच्या मिलनसाठी उत्तम काळ असल्याची सूचना हा ऋतु देत असून भारतोय संस्कृतित तसेच आरोग्यशास्त्रने तुळशिला विशेष महत्व दिल असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषद चे माजी नगरसेवक प्रमोद वर्णम यांनी प्रभाग क्र 3 येथील संजय नगर ,बंगला कॉलोनित आयोजित तुळशी विवाह कार्यक्रमात व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभाग क्र 3 येथे तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने पार पडला.यावेळी मोठ्या संख्येत गृहिणींनी या तुळसी विवाहाला उपस्थिती दर्शविली तर या तुळसी विवाहाच्या मंगलाष्टके गायली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.