दक्षिण नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचं आश्वासन -आमदार मोहन मते

नागपूर: दक्षिण नागपूर हा अत्यंत मध्यम वर्गीय नागरिकांचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. या मतदारसंघात अनेक युवक युवती यांच्या आर्थिक परिस्थिती / क्षमतेनुसार शिक्षण घेत असतात. या मतदारसंघांचे आमदार मोहन मते यांनी प्रवास, पाहणी केली असता अनेक सुशिक्षित तरुण, उच्च शिक्षित असून त्यांच्या हाताशी काम नाही. या अनुषंगाने युवक युवती सोबत प्रत्यक्ष चर्चा केली असता अनेक खाजगी कंपनी मध्ये कामाच्या संधी असून सुद्धा या युवकांना संधी दिली जात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आमदार मोहन मतेंनी याची दखल घेऊन विदर्भातील नामांकित खाजगी कंपनी मालकांसोबत व्यक्तीशः भेटून चर्चा करून दक्षिण नागपूरच्या युवकांना त्यांचा व्यवसायात सेवेची संधी देण्याबाबत चर्चा केली. हि चर्चा सकारात्मक होऊन या कंपनीतील मनुष्यबळ हाताळणारे (Humen Resources) अधिकारी यांच्या सोबत सत्र आयोजित करण्याबाबत एकमत झाले.
याअनुषंगाने दि. ९ जानेवारी रोजी, रामदासपेठ हॉटेल सेंटर पोईट नागपूर येथे  ” HR & BUSINESS MEET”  याबैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत नागपूर तसेच विदर्भातून एकूण १०० पेक्षा अधिक खाजगी कंपनीचे अधिकारी आले होते. तसेच त्यांनीं दक्षिण नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचे आश्वासन दिले. याचर्चा सत्राचे आयोजन करण्यात महत्वाची भूमिका माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व सहकारी यांची असून त्यांनी यांकरिता कठोर परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

हार या हेल्मेट ? वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त केली जनजागृती

Wed Jan 12 , 2022
नागपूर : यमराज खुश हुआ  ! शहरातील शंकर नगर चौकात यमराजाच्या वेशात एक व्यक्ती हेल्मेट न घातलेल्या  दुचाकीस्वारांशी  बोलताना दिसला रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने “हार या हेल्मेट” ही जनजागृती मोहीम राबवली. हेल्मेट घालणे आणि रस्ता सुरक्षेतील त्याचे महत्त्व यावर या मोहिमेचा भर होता. शंकर नगर चौकात हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये हेल्मेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com