जलसंधारण अधिकारी पदासाठी कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी,उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

यवतमाळ :- मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब या अराजपत्रित पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांची गुणनिहाय सुधारित मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लिस्टमधील उमेदवारांची प्राथमिक स्तरावर कागदपत्र पडताळणी दि.१६ ते १९ आँक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वाल्मी या संस्थेच्या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांनी पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

जलसंधारण अधिकारी या पदासाठी दि.१४, १५ व १६ जुलै रोजी आँनलाईन परीक्षा घेण्यात आली. परिक्षेतील गुणांवर आधारित सुधारित मेरीट लिस्ट http://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.२९ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची यादी देखील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रपत्रामधील नमुद उमेदवारांना गुणवत्ता व नमुद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर केवळ कागदपत्र तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी, तपासणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार अंतीम निवडसूची तयार करण्यात येणार आहे. याबाबत अंतीम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य निवड समितीस राहणार आहे.

उमेदवारांची नियुक्तीच्या वेळी मुळ कागदपत्रे जसे वय, अधिवास, शैक्षणिक पात्रता, महिला आरक्षणानुसार विहीत केलेले प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तपासून रुजू करुन घेण्यात येईल. त्यामुळे संकेतस्थळावरील प्रपत्रात नमुद उमेदवारांनी जल व भुमी व्यवस्थापन संस्था, वाल्मी परीसर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे वेळापत्रकानुसार वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार बुधवार दि.१६ आँक्टोंबर रोजी अनुक्रमांक १ ते १११ या उमेदवारांनी सकाळी ९ ते दुपारी १ तर अनुक्रमांक ११२ ते २२२ या उमेदवारांनी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान पडताळणीसाठी उपस्थित रहायचे आहे. गुरुवार दि.१७ आँक्टोंबर रोजी अनुक्रमांक २२३ ते ३३३ या उमेदवारांनी सकाळी ९ ते दुपारी १ तर अनुक्रमांक ३३४ ते ४४४ या उमेदवारांनी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान उपस्थित रहायचे आहे.

शुक्रवार दि.१८ आँक्टोंबर रोजी अनुक्रमांक ४४५ ते ५५५ या उमेदवारांनी सकाळी ९ ते दुपारी १ तर अनुक्रमांक ५५६ ते ६६६ या उमेदवारांनी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान उपस्थित रहायचे आहे. शनिवार दि.१९ आँक्टोंबर रोजी प्रतिक्षा सूचीतील अनुक्रमांक १ ते १०८ या उमेदवारांनी सकाळी ९ ते दुपारी १ तर १०९ ते २१६ क्रमांकाच्या उमेदवारांची तपासणी सूची भरुन संबंधित मुळ कागदपत्र व दोन साक्षांकित प्रतींसह वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यवतमाळ बसस्थानकाच्या नवीन ईमारतीचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण

Tue Oct 15 , 2024
Ø विविध सुविधा असलेली सुसज्ज ईमारत प्रवाशांच्या सेवेत Ø ईमारत बांधकामावर 13 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च यवतमाळ :- यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने बसस्थानकाची नवीन सुसज्ज ईमारत बांधण्यात आली आहे. 13 कोटी 83 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या ईमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे झाले. लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com