नागपूर :- राष्ट्रीय कुणबी महासंघा च्यावतीने रविवारी १४ जुलै रोजी नुकत्याच झालेल्या आढावा बैठक कार्यक्रमात धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर ला सभा संपन्न झाली. कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी व विकासासाठी समाज बांधवांनी पाऊल उचलण्याची गरज आहे. या सभेमध्ये आलेल्या मान्यवरांनी या सभेमध्ये अध्यक्ष म्हणून जनार्धन पाटील दिल्ली व प्रमुख पाहुणे मध्यप्रदेश भागवत महाजन यांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्रातील अनेक पाहुणे मंडळीची उपस्थिती होती. जनार्दन पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून कुणब्यांच्या समस्या आपल्याला एकत्र होऊन कशा सोडवता येतील. त्यांनी प्रखरतेने आपली मत मांडली कुणबी समाज हा अनेक राज्यांमध्ये विखुरलेला आहे आणि मागासलेला पण आहे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय मागासलेला आहे. आपल्या समाजाची प्रगती व्हावी च्या हेतूने आपल्याला पाऊल उचलणे गरजेचे आहे. म्हणून जनजागृती करून आपल्या समाज बांधवांना एकत्र होणे ही काळाची गरज आहे असे ते बोलले काही समाजसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
१) जातनिहाय जनगणना झालीच पाहिजेत
२) कुणबी समाजाला संख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजेत
३) शेतकऱ्यांना पेन्शन योजना साठ वर्षानंतर लागू करावी.
४) बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपये भत्ता देण्यात यावे.
५) देशामध्ये 40% कुणबी समाजाची संख्या आहे. विधानसभेत व लोकसभेत एस सी एस टी प्रमाणे आरक्षण मिळावे.
६) क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी.
७) मंडल कमिशन १००% टक्के लागू करण्यात यावे.
कुणबी समाज बांधवांनी ह्या भावना व्यक्त केल्या.यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपस्थितीत मान्यंवर डी.के.आरीकर, गुणेश्वर आरीकर, सुरेश गुडदे, पुरुषोत्तम शहाणे, ॲड. अशोक येवले, प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर, दादाराव डोंगरे, सुषमा भड, साधना बोरकर, अर्चना बर्डे, दामोदर तिवाडे सुरेश वर्षे, ॲड. गिरीश बोभाटे ॲड. रेखा बाराहाते, डॉ. तुकाराम धोबे प्रा. बळवंत भोयर, आशिष तायवाडे, उमेश सिंघन जुडे, राहुल करांगळे, स्वप्निल रोहनकर, प्रकाश काळपांडे, अशोक पांडव, अनंत भारसाकडे, ॲड.अंजली साळवे, बाबाराव भोयर, प्रा. कुशल शेंडे, डॉ नंदकिशोर राऊत हेमराज माले, ॲड. निशा आरीकर, निर्मला मानमोडे, शालिनी पानसे, प्रा.नितीन चौधरी, पंकज पांडे, ॲड.रमेश कोठाळे, सुरेश कोगे, राजेश काकडे, वैशाली चिखले, राजाराम डोनारकर, राजेश ठाकरे इत्यादी कुणबी समाजबांधव उपस्थित होते.