अजनी ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा
जागतिक महिला दिनानिमित्त नव-युवक एज्युकेशन सोसायटीचा अभिनव उपक्रम
नागपुर – नागरिकांच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्यावर असलेली व्यक्ती अशीच प्रतिमा पुरुष व महिला पोलिसांची जनसामान्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु, महिला पोलिस या कर्तव्याबरोबरच कुटुंब संगोपन अश्या दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘रणरागिणी’ असल्याचे सुतोवाच नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे यांनी केले. कुंजीलालपेठ, बाबुळखेडा येथील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित मानवता प्राथमिक व हायस्कुलतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी 11 वाजता अजनी पोलिस ठाण्यात विविध पदावर कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथीमध्ये अजनी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, अध्यक्षस्थानी नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे संचालक संकेत डोंगरे, प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनोज गावंडे, सामाजिक कार्यकर्ते सुमित गजभिये, महिला सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी मोहरे, नव-युवक एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सौरभ डोंगरे, सुहास खरे, निरज रंगारी आदिंची उपस्थिती होती. यावेळी मान्यावरांच्या हस्ते महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शॉल, फुलांचे रोपटे व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलतांना संकेत डोंगरे म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था, सभा, समारंभ, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पुरुष व महिला पोलिसांना ‘ऑन डयुटी चोवीस तास’ काम करावे लागते. परंतु, महिला पोलिसांना नोकरीसह कौटुंबिक जबाबदारी अशी दोन जबाबदार पार पाडावी लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक स्थितीवर होतो. त्यामुळे पोलीस दलातील कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारीचा ताळमेळ बसविण्यासाठी अनेक ही तारेवरची कसरतच असते. अश्या कर्तृत्वान महिला पोलिसांचा आदर्श घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे विनंतीही यावेळी संकेत डोंगरे यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या-
तत्पूर्वी महिला पोलीस हेडकाॅन्सटेंबल मैफुजा खान, हेडकाॅन्सटेंबल बबिता डेहनकर, अलका ढेंगरे, एनपीसी कविता झाडे, एनपीसी गिता चैव्हाण, डब्ल्युपीसी मंजुषा चौधरी, संगिता वर्मा, रेषमा डोंगरवार, सोनू घोंगरे आदि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे संचालन पलाश शंभरकर तर आभार राजरत्न रामटेके यांनी मानले.