संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
समान संधी कक्षाची स्थापना
कामठी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे, सामाजिक न्याय विभाग नागपूर व समाजकार्य महाविद्यालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी समाजकार्य महाविद्यालय कामठी येथे समान संधी कक्षाचा उद्घाटन सोहळा व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना बद्दल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रुबीना अन्सारी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून हृदय गोडबोले, प्रकल्प अधिकारी, बार्टी, नागपूर, सुनिता गेडाम, समतादूत, कामठी, शुभांगी टिंगणे समतादूत,पारशिवनी, राष्ट्रपाल डोंगरे, समतादूत,कुही यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम व समान संधी कक्षाचे समन्वयक डॉ. मनोज होले यांची उपस्थिती लाभली होती.
या प्रसंगी हृदय गोडबोले व प्राचार्य डॉ.रुबीना अन्सारी यांनी लाल फीत कापून समान संधी कक्षाचे उद्घाटन केले. हृदय गोडबोले, सुनिता गेडाम, शुभांगी टिंगणे,यांनी समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी सामाजिक न्याय विभागांच्या विविध योजनांचा फायदा घेऊन विद्यार्थी कशाप्रकारे शिक्षणाच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. देशातील व परदेशातील नामवंत संस्थामध्ये कशाप्रकारे उच्च शिक्षण प्राप्त करून स्वतःला उच्चपदावर पोहोचवू शकतात याविषयी सखोल मार्गदर्शन केले. संचालन डॉ. मनोज होले यांनी प्रास्ताविक प्रफुल्ल बागडे यांनी केले तर आभार उज्वला मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समान संधी कक्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी सदस्य स्नेहा घोडे, राहुल शामकुवर, सदानंद सोमकुवर, प्रतीक्षा हिवरकर, प्रांजली वाटकर यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी वसंता तांबडे, शशील बोरकर, नीरज वालदे, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.