प्रजासत्ताक दिनी चालले सोशल मिडिया वर पाटी लावा अभियान
नागपूर :- 2021 च्या जनगणना कार्यक्रमात केंद्राद्वारे ओबीसीची जनगणना केल्या जात नसल्याने ओबीसींची जनगणना व्हावी या मागणीसाठी आता ओबीसींनी पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनी पाटी लावा अभियाना मार्फत सोशल मीडियातुन “सरकार ओबीसींची जनगणना करा अन्यथा ओबीसींचा कॉलम नाही तर आमचा सहभाग नाही” या भूमिकेतून आंदोलन छेडले.
गेली कित्येक दशके ओबीसीची जनगणना केंद्र सरकार द्वारे केल्या जात नसल्या ओबीसी प्रवर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे आणि ओबीसी जनगणनेची मागणी तीव्र होत आहे.
2021 च्या जनगणना कार्यक्रमात केंद्राद्वारे पुन्हा एकदा जनगणना कार्यक्रमातील नमुना प्रश्नावली मध्ये ओबीसी प्रवर्गाला डावलले.
ओबीसीची जनगणना केल्या जात नसल्याने ओबीसींची जनगणना व्हावी या मागणीसाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, संसद आणि विधिमंडळा पर्यंत 2021 चा ओबीसी जनगणनेचा लढा पोहचविणा-या डॉ ऍड अंजली साळवे यांनी सुरू केलेल्या ‘पाटी लावा मोहीम’ अंतर्गत महाराष्ट्रातील असंख्य ओबीसी बांधव ‘सरकार ओबीसी ची गणना करा अन्यथा 2021 च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ असा संदेश असलेली पाटी लावा मोहीम प्रजासत्ताक दिनी सोशल मीडियावरून ओबीसी प्रवर्गाने राबविली असल्याची माहिती लढा ओबीसी जनगणना व पाटी लावा अभियानाच्या संयोजक डॉ ऍड अंजली साळवे यांनी दिली.