नागपूर, ता. २४ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल)तर्फे शहरातील छायाचित्रकारांसाठी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि क्लायमेट सेंटर्स फॉर सिटीज एनआययूए यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून फोटोग्राफी स्पर्धेत छायाचित्र पाठविण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी २०२२ पर्यंत आहे. पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षिसे प्रदान करण्यात येतील.
शहरात हवामान प्रभाव, शहरांमध्ये हवामान कृती या दोन श्रेणींमध्ये छायाचित्र सादर करावीत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. छायाचित्रांसोबत इंग्रजीत कॅप्शन आवश्यक असून ते ५० शब्दांपेक्षा मोठे नसावे. चित्रावर कोणतेही वॉटरमार्क नसावेत. छायाचित्रावर सहभागीचे नाव आणि शहराचे नाव लिहावे. सर्व छायाचित्र https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe9VbinhR8CsltDmh7u9OSgXwiZApe8T-oAEUyt69LmcOxFXg/viewform?usp=sf_ द्वारे जमा केले जावेत. फॉर्ममध्ये चित्र आणि मथळे अपलोड करण्याचे पर्याय समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. पराग अरमल +919890946236 यांच्याशी संपर्क साधावा.